Deficiency fingers blue SAAM TV
लाईफस्टाईल

Deficiency fingers blue: थंडीच्या दिवसांत का निळी पडू लागतात बोटं? शरीरात 'या' कमतरतेने रंग बदलत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा

vitamin deficiency fingers blue: हिवाळ्यात अनेकांना बोटे निळसर दिसणं ही समस्या जाणवते. तज्ज्ञांच्या मते, हा बदल फक्त थंडीमुळे नाही तर शरीरातील काही कमतरतेमुळे होतो.

Surabhi Jayashree Jagdish

थंडीच्या दिवसात अनेक आजार बळावताना दिसतात. यामध्ये हृदयाच्या समस्या, त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशातच थंडी सुरु झाली की, काही लोकांच्या हातांची बोटं अचानक पांढरी, निळी किंवा हलकी जांभळी पडू लागतता. बोटांचा रंग बदलण्यासोबतच काही वेळी वेदना किंवा सूज देखील दिसून येते. अनेकदा लोकं याकडे थंडीची समस्या म्हणून दुर्लश्र करतात. मात्र याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

वैद्यकीय भाषेत हे रेनाड्स सिंड्रोमचे संकेत असू शकतात. ही समस्या खासकरून ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांमध्ये दिसून येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या खासकरून त्या व्यक्तींमध्ये दिसून येते ज्या व्यक्ती थंड आणि गरम पाण्यामध्ये काम करत असतात. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात नेमकी कशाची कमी आहे हे जाणून घेऊया.

थंडीच्या दिवसात का बोटं पडतात नीळसर?

रेनाड्स सिंड्रोममध्ये हात आणि पायांच्या रक्तवाहिन्या थंड पडून आकुंचन पावतात. यामुळे पाय किंवा हाताच्या बोटांना योग्य पद्धतीने रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशन थांबल्यामुळे बोटांमध्ये सुन्नपणा, जळजळ होऊ लागते आणि त्यानंतर बोटांचा रंग बदलतो.

काही व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक ताण आल्यावर ट्रिगर होऊ शकते. तर काही लोकांमध्ये ६० ते ७० डिग्रीमध्ये राहिल्यास ही लक्षणं दिसून येतात.

कोणत्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो?

बोटांचा रंग नीळा पडण्याचा सर्वाधिक धोका हा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना असतो. त्याचप्रमाणे वायब्रेटिंग टूल्स चालवणाऱ्या व्यक्ती, थंड-गरम पाण्यात सतत काम करणाऱ्या व्यक्ती तसंच घरची कामं करणाऱ्या महिलांना याचा धोका अधिक असतो. डॉक्टरांनुसार, थंडीच्या दिवसात ओपीडीमध्ये तब्बल ६० टक्के रूग्णांमध्ये ही लक्षणं दिसून येतात.

या समस्येपासून कसा बचाव करावा?

रेनाड्सपासून बचाव करण्यासाठी जास्त थंड पाण्याच्या संपर्कात येऊ नये. त्याचप्रमाणे घरात चालताना अनवाणी चालू नये. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिटेर्जेंटला थेट हात लावू नये.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...म्हणून विरोधीपक्षनेते पद हवंय; हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आक्रमक

‘सागरा प्राण तळमळला’, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अंदमानमध्ये अनावरण|VIDEO

दोन्ही डोळे बाहेर अन् गुप्तांगावर वार; तरूणाची क्रूर हत्या, बेडखाली रक्ताने माखलेला मृतदेह पाहून..

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

Kitchen Hacks : घरातील काचेचे बाल्कनी दरवाजे लवकर घाण होतात? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT