Women iron deficiency SAAM TV
लाईफस्टाईल

Women iron deficiency: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आयर्नची कमतरता का असते अधिक? काय असू शकतात कारणं जाणून घ्या

Women iron deficiency reasons: आरोग्यतज्ज्ञांच्या मते, महिलांना पुरुषांपेक्षा लोह कमतरतेचा धोका अधिक असतो. ही समस्या विशेषतः प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये आढळते आणि यामुळे Anemia होण्याचा धोका असतो.

Surabhi Jayashree Jagdish

लोहं हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असणारं मिनरल आहे. हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्याचं कारम करतं. हिमोग्लोबिनमुळे तुमच्या शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जर तुमच्या शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता निर्माण झाली तर तुम्हाला थकवा, चक्कर येणं किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होणं या समस्या समोर येऊ शकतात.

काही रिपोर्ट आणि रिसर्चनुसार, असं समोर आलं आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लोहाची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येतेय. यामागे नेमकी काय कारणं असतात ती जाणून घेऊया.

महिलांमध्ये आयर्नची कमी होण्याची कारणं

मासिक पाळी

महिलांमध्ये आयर्नची कमी असल्याचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे पिरीयड्स. दर महिन्याला पिरीयड्समध्ये होणाऱ्या रक्तस्रावामुळे शरीरातून आयर्न कमी होऊ लागतं. ज्या महिलांना पिरीयड्समध्ये जास्त दिवस रक्तस्राव होतो त्यांच्या शरीरातून अधिक रक्त निघून जातो. ज्यामुळे लोहाची कमतरता वाढू शकते.

प्रेग्नेंसी आणि ब्रेस्टफिडींग

गर्भवती महिलेला स्वतःसोबत गर्भात असलेल्या बाळाला देखील लोहाची गरज असते. भ्रूणचा विकास, प्सेंसेंटा बनवण्यासाठी आणि रक्ताची मात्रा वाढवण्यासाठी लोहाची भूमिका महत्त्वाची असते. डिलीवरीनंतर स्तनपान करताना शरीरातून पोषण निघून जातं. जर अशावेळी योग्य आहार मिळाला नाही तर महिलांमध्ये लोहाची कमतरता होऊ शकते.

आहारात पोषणाची कमतरता

काही महिला वजन कमी करण्यासाठी डायटींग करतात. ज्यामध्ये त्या कमी प्रमाणात खाणं खातात. परिणामी शरीराला पुरेशा प्रमाणात आयर्न मिळत नाही.

पचनासंबंधी समस्या

काही महिलांमध्ये गंभीर आजार, स्टोन, अल्सर किंवा पचनासंबंधी समस्या असतात. दरम्यान या समस्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते.

हार्मोनल बदल

महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत असतात. अशावेळी या हार्मोनल बदलांमुळे आयर्नची लेवल कमी होऊ शकते. काही वेळा शरीरात हार्मोन्स असंतुलित होत असल्याने योग्य प्रमाणात आयर्न शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

कशी दूर करावी आयर्नची कमतरता?

महिलांनी आयर्न असलेले पदार्थ जसं की, हिरव्या भाज्या, बीट, द्राक्ष, गुळ, डाळी आणि अंडं यांचा समावेश केला पाहिजे. त्याचप्रमाणे व्हिटॅमीन सी जसं की, संत्र, लिंबू आणि आवळा खाल्ल्याने आयर्नचं लगेच पचन होतं. जर महिलांमध्ये आयर्नची कमतरता जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लीमेंट्स सुरु करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भावी शिक्षकांना मोठा दणका; TAIT परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Silver Mangalsutra Design: तुमच्या लाडक्या बायकोला द्या हे फॅन्सी मंगळसूत्र, बघताच क्षणी प्रेमाने करेल कौतुक

बापरे! बदलापूरच्या आंबेशिवमध्ये दोन-दोन बिबटे; भरदुपारी कुत्र्याची शिकार केल्याचा दावा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ १५००;कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT