
आपली झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे, हे आपल्याला माहीत आहेच. पण एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल ती म्हणजे संपूर्ण अंधारात झोपल्याने तुमची झोपच चांगली होत नाही, तर तुम्हाला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही वाचवलं जाऊ शकतं.
ही गोष्ट फक्त समज-गैरसमज नाही, तर अनेक वैज्ञानिक संशोधनांनी सिद्ध केलेला एक महत्त्वाचा सत्य आहे. तज्ज्ञांनी नेमकं काय संशोधन केलंय आणि त्यातून काय बाबी समोर आल्या आहेत ते पाहूयात.
आपल्या शरीरात एक नैसर्गिक बायोलॉजिकल घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. हे घड्याळ आपल्याला कोणत्या वेळेस झोपायचं, उठायचं, हार्मोन तयार करायचं, पेशी दुरुस्त करायच्या हे सगळं ठरवत असतं. पण जर आपण झोपताना खोलीत लाईट चालू ठेवला, अगदी छोटा नाईट लॅम्प जरी चालू ठेवला तरी, आपल्या मेंदूला गोंधळ होतो. यावेळी बाहेर रात्र आहे की दिवस यामध्ये मेंदूचा गोंधळ होतो.
मेलाटोनिन हे हार्मोन रात्री अंधारात शरीरात तयार होतं. यालाच "स्लीप हार्मोन" असंही म्हणतात. पण त्याचं काम फक्त झोपेचं नाही. मेलाटोनिन हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे. ते आपल्या शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला रोखतो. हे फ्री रॅडिकल्स आपल्या डीएनएला इजा करून कॅन्सर पेशींची निर्मिती करू शकतात.
पण जर तुम्ही रात्री लाईटमध्ये झोपता, तर मेलाटोनिनचं उत्पादन कमी होतं आणि शरीराची नैसर्गिक कॅन्सरविरोधी सुरक्षा कमजोर होऊ शकते
Cancer Causes & Control या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका स्टडीमध्ये असं आढळलं की, रात्री पूर्ण अंधारात न झोपणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो.
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधनात असं सिद्ध झालं की, मेलाटोनिन ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सर पेशींची वाढ थांबवू शकतो.
Chronobiology International मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, ज्यांच्या शरीरात मेलाटोनिन रात्री कमी तयार होतो, त्यांना विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो.
झोपेची गुणवत्ता चांगली होते
उठल्यावर फ्रेश वाटतं
तणाव आणि नैराश्य कमी होतं
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
हार्मोन संतुलन सुधारतं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.