Unhealthy Sleeping Pattern: 8 तासांची झोप घेऊनही तुमच्याकडून नकळत होतेय 1 चूक; आजारी पडण्याची शक्यता वाढते

8 hours sleep but making 1 mistake sick risk: आरोग्य तज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ७ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे, कारण झोप आपल्या शरीराला विश्रांती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
sleep
sleepSaam Tv
Published On

झोप ही प्रत्येक व्यक्तीसाठी फार गरजेची असते. आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला ७-८ तासांची झोप घेणं फार गरजेचं आहे. जर पुरेशी झोप झाली नाही तर त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. मात्र, पुरेशी झोप घेऊन देखील तुम्हाला थकवा किंवा आळस आलाय, असं कधी तुमच्या बाबतीत घडलंय का?

जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर यामागे तुमची एक मोठी चूक कारणीभूत असू शकते. ही चूक म्हणजे झोपेच्या ठरलेल्या वेळा न पाळणं. आरोग्यासाठी केवळ पुरेशी झोप घेणे पुरेसे नसून योग्य वेळी झोपणं आणि उठणं देखील फार तेवढचं महत्त्वाचं आहे. जर हे ठरलेलं रूटीन बिघडलं तर तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

sleep
Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

पुरेशी झोप असूनही आरोग्य का बिघडते?

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, झोपेचा एक निश्चित वेळ असणं गरजेचं आहे. जर आपण दररोज ठराविक वेळी झोपलो आणि उठलो तर शरीर फ्रेश आणि एक्टिव्ह राहतं. मात्र जर आपण रात्री उशिरा झोपलो तर शरीराची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं यामुळे थकवा कायम राहतो. ही अनियमितता हार्मोन्सचं संतुलन बिघडवतं आणि स्नायूंची दुरुस्तीही नीट होत नाही. त्यामुळे झोपेचा वेळ निश्चित ठेवणं अत्यावश्यक आहे.

वेळेवर न झोपल्याचे तोटे

खराब झोप

दररोज वेगवेगळ्या वेळी झोपणं आणि उठणं यामुळे चांगली झोप लागत नाही. परिणामी शरीर सतत थकलेल्यासारखं वाटू लागतं.

sleep
Breast cancer prevention:'या' एका साध्या आणि सोप्या उपायाने टाळता येतो ब्रेस्ट कॅन्सर; 10% ते 25% धोका कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर

वजन वाढणं

झोपेच्या ठराविक वेळ न पाळल्यामुळे मेटाबॉलिझमवर परिणाम होऊ लागतं. अशावेळी वजन वाढीची समस्या सतावू लागते. झोपेचा खराब पॅटर्नही तुमच्या भूकेवर परिणाम करतं.

हार्मोनल असंतुलन

अनियमित झोपेमुळे शरीराचं सर्केडियन रिदम बिघडू लागतं. त्यामुळे मेलाटोनिन, कोर्टिसोल आणि इन्सुलिन यांसारख्या हार्मोन्सचे संतुलन ढासळू लागतं.

sleep
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यासाठी 'ही' एक टेस्ट वाचवेल तुमचा जीव; कमी वेळेत होतं अचूक निदान

मानसिक आरोग्यावर परिणाम

झोपेचा पॅटर्न खराब असल्यास त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. मानिसक आरोग्यामुळे चिडचिड, मूड स्विंग्स आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होऊ लागते.

sleep
Breast cancer screening: ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी फक्त मॅमोग्राफी पुरेशी नाही? डॉक्टरांनी सांगितली दुसरी पद्धत

झोपेचा वेळ कशी फिक्स्ड ठेवाल?

जर तुम्ही ८ तास झोप घेत असूनही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर झोपेची वेळ निश्चित करणं आवश्यक आहे. यावेळी झोपेचं रूटीन ठरल्यास तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com