White Hair Solution Saam TV
लाईफस्टाईल

White Hair Solution : कोळशासारखे काळेभोर केस हवेत? 'या'टीप्स फॉलो करा

White Hair Solution at Home : काही केस काळे आणि काही केस पांढरे दिसतात. त्यामुळे विविध डाय आणि मेहंदी अनेक जण केसांवर अप्ल्याय करतात. या प्रोसेसमुळे काहीवेळाने आपले केस गळू लागतात.

Ruchika Jadhav

केस पांढरे व्हायला लागले की, सुरुवातील २ ते ४ केस पांढरे झाल्याचे दिसतात. त्यानंतर एक एक करून संपूर्ण डोकं सफेद केसांनी भरू लागतं. मग काही केस काळे आणि काही केस पांढरे दिसतात. त्यामुळे विविध डाय आणि मेहंदी अनेक जण केसांवर अप्ल्याय करतात. या प्रोसेसमुळे काहीवेळाने आपले केस गळू लागतात.

सुरुवातीला मेहंदी आणि डाय लावल्यावर केस फार चमकतात. मात्र नतंर हळू हळू केस विरळ होत जातात. तसेच आठवडाभरानंतर पाढऱ्या केसांचा रंग उडून जातो. हा रंग उडाल्यानंतर आधीपेक्षा केस आता परत जास्त पांढरे दिसतात. त्यामुळे काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जातात.

सुंदर दिसण्यासाठी मुलं किंला मुली केसांवर विविध प्रयोग करतात. मात्र त्यामुळे थेट तुम्हाला टक्कल पडणार असेल तर आताच असे डाय आणि मेहंदी वारणे बंद करा. त्याऐवजी केस सफेद करण्यासाठी काय करावे याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत.

साहित्य

२ते ३ चमचे बेसन पीठ

१ चमचा मेथी दाणे

पाणी

२ चमचे अॅलोवेरा जेल

४ ते ५ अंजिरचे तुकडे

२ चमचे अंजिर तेल

४ते ५ चमचे दही

कृती

सर्वात आधी मेथीचे दाणे आणि अंजिर एकत्र भिजत ठेवा. त्यानंतर त्यात थोडं पाणी मिक्स करून मिक्सरला बारीक करून घ्या. एका भांड्यात ही पेस्ट काढून घ्या. त्यामध्ये बेसन पीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्या. पुढे यामध्ये अॅलोव्हेरा जेल देखील मिक्स करून घ्या. पेस्ट बनवताना ती जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. पेस्ट थोडी घट्ट झाली तरी चालेल मात्र ती पातळ करू नका.

अप्लाय कसे कराल?

ज्याप्रमाणे आपण केसांना मेहंदी लावतो तसेच ही पेस्ट केसांवर अप्लाय करा. ही पेस्ट बनवून घरामध्ये तशीच ठेवू नका. पेस्ट बनवल्यावर लगेचच मेहंदीप्रमाणे केसांवर लावून घ्या. त्यानंतर आर्धा तास ही पेस्ट केसांमध्येच ठेवा. तसेच जास्त थंड किंवा जास्त गरम नाही तर अगदी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवूनल घ्या. केस धुवत असताना त्यांना शॅम्प्यू लावू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

SCROLL FOR NEXT