बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

amaravati road accident : बाजारातून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
amaravati accident
amaravati road accidentSaam tv
Published On
Summary

मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन उलटलं

पाच जण जागीच ठार; दहा ते बारा जण जखमी

रस्त्यावरील खड्ड्यामुळे 50 फूट दरीत पिकअप वाहन पलटी झाल्याची चर्चा

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव ,सुसर्दा, शिवाझीरी नारदु या रस्त्याने प्रवास करत असलेल्या पिकअपचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअप पन्नास फूट दरीत कोसळून उलटल्याची घटना घडली आहे. अपघातात पिकअपमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित दहा ते बारा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णवाहिकेने धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

amaravati accident
PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

मिळालेल्या माहितीनुसार, राणीगाव गावालगत असलेल्या कंजोली गावातील नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई येथील आठवडी बाजाराकरिता गेले होते. राणीगावाील मजूर हे राणीगाव, शिवाझीरी, सुसरदा, नारदु,झिल्पी मार्गे मध्य प्रदेशातील देडतालई येथे आठवडी बाजाराकरिता गेल्याची माहिती हाती आली आहे. या पिकअप वाहनाने 15 ते 20 जण गेले होते.

amaravati accident
'अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलणं दुर्देवी'; अमोल मिटकरी असे का म्हणाले?

अपघात नेमका कशामुळे घडला?

मध्य प्रदेशच्या गावातील बाजार आटोपून घरी येत असताना सायंकाळी सहा वाजताच्या पिकअप वाहन राणी गाव ते शिवाझिरी घाट वळणाच्या रस्त्यादरम्यान घोडादेव बाबाजवळ असलेल्या धामण या ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे पिकअप वाहन 50 फूट खोल दरीत उलटलं.

पिकअप उलटल्याने कंजोली येथील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित दहा ते बारा जण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेत असल्याची माहिती हाती आली आहे. पिकअप अपघातातील सर्व जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

amaravati accident
अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

तत्पूर्वी, पिअकपमध्ये नेमकं किती जण होते, मृत्यू पावलेल्या मजुरांची नावे काय आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मृतांमध्ये महिलांचा समावेश होता का, याची माहिती समोर आलेली नाही. परंतु राज्यातील वाढत्या अपघातामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com