India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

India vs South Africa T20 WC South Africa Win By 76-Run Win : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या नेट रन रेटवरही मोठा परिणाम झाला.
 India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out
Published On

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकच्या सुपर ८ सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने १८७ धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा ७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या नेट रन रेटवरही मोठा परिणाम झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात इशान किशन खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात जानसेनने तिलक वर्माला बाद केले. सूर्या आणि अभिषेक यांच्यात मोठी भागीदारी होण्याची अपेक्षा होती, परंतु अभिषेकने पुन्हा एकदा निराशा केली. सुपर ८ च्या ग्रुपमधील भारताचा हा पहिला सामना होता. या सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.

 India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out
ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

'दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम', अशी हिंदीमधील म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेल. अगदी असेच काहीतरी आजच्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात झालं. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व ठेवत दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डरची फलंदाजी पूर्णपूणे नाकामी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी मात्र गबाळ कामगिरीचं प्रदर्शन करत आजचा समाना गमावला. भारताने २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या शेवटच्या टी२० विश्वचषकात एकही सामना न गमावता विजय मिळवला होता. पण, यंदाच्या स्पर्धेत हा त्यांचा पहिलाच पराभव झाला. धावांच्या बाबतीतही हा भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला.

पंड्या, अभिषेक आणि सूर्या अपयशी

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. इशान किशन एकही धाव न घेता परतला. तिलक वर्माचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. दरम्यान अभिषेक शर्माला १२ चेंडूत १५ धावा काढल्यानंतर मार्को जॅनसेनने बाद केले. कर्णधार सूर्यकुमार यादवला दोन चौकारांच्या मदतीने १८ धावा काढल्यानंतर कॉर्बिन बॉशने झेलबाद केलं.

भारतीय फलंदाजांचा कमकुवतपणा उघड

वॉशिंग्टन सुंदर ११ धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्या १७ चेंडूत १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केशव महाराजांच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना रिंकू सिंगने चेंडू थेट ट्रिस्टन स्टब्सच्या हातात मारला आणि त्याला त्याचे खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंगही फक्त एका धावेवर बाद झाला, तर बुमराहही न धाव करता तंबूत परतला. अशाप्रकारे भारताचा डाव फक्त १११ धावांवर संपला. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक ३७ चेंडूत ४२ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com