55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Brothers Reunite After 55 Years Buldhana Maharashtra: तुम्ही अनेकदा चित्रपटांच्या कथांमध्ये पाहिले असेल की, ब-याच वर्षांनंतर दोन भावांची भेट होते. मात्र चित्रपटातील कथेला लाजवेल अशी बातमी समोर आलीय...रियल लाईफमध्येही दोन भावाची तब्बल 55 वर्षांनी भेट झालीय... ही भेटीची कहाणी काय आहे?
Two brothers share an emotional moment in Khamgaon hospital after reuniting 55 years apart.
Two brothers share an emotional moment in Khamgaon hospital after reuniting 55 years apart.Saam Tv
Published On

एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू.... हे चित्र आहे बुलढाण्याच्या खामगावच्या सरकारी दवाखान्यातील.... पाठीला पोक आलेल्या 70 वर्षीय मॅथ्यू या आजोबांची ही कहाणी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल.... तब्बल 55 वर्षांनी वर्गीय मॅथ्यूज आपल्या भाऊ आणि रक्ताच्या नातेवाईकांना भेटताहेत..आणि हाच भावनिक क्षण कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनाचा ठाव घेईल.....

मात्र वर्गीस मॅथ्यूज यांची कहाणी सुरु होते ती 55 वर्षांपुर्वी केरळच्या त्रूचरमधून..... वयाच्या पंधराव्या वर्षी मॅथ्यूज यांनी घरगुती भांडणामधून रागाच्या भरात घर सोडलं....आणि केरळमध्ये मिळेल ते काम करत राहिले... मॅथ्यूज मिळेल त्या पैशातून पोट भरायचे... तर कष्टाच्या कमाईतून मिळालेला पैसा अनाथआश्रमाला दान करायचे... आयुष्यभर मॅथ्यूज दुसऱ्यांसाठी जगत राहिले.... मात्र कुटुंबियांपासून दूर गेल्यानं जीवाला खात राहिले.. वय वाढत गेलं... शरीर थकत गेलं.... मात्र आपल्याला कुणीच सांभाळणारा नाही... ही जाणीव जीव कुरतडून टाकू लागली... आणि त्याच भावनेतून मॅथ्यूज केरळहून मुंबईच्या दिशेनं निघाले.....

मात्र नातेवाईकांचा विरह मॅथ्यूज यांचा जीव जाळत होता... आणि आता आपले नातेवाईक भेटतील की नाही... याच विवंचनेतून 70 वर्षीय मॅथ्यूज यांनी नांदूरा परिसरात अचानक रेल्वेतून उडी घेतली... मॅथ्यूज गंभीर जखमी झाले....रेल्वेच्या रुळावर तडफडत राहिले.. त्याचवेळी खामगावचे रमेश अवचर यांनी मॅथ्यूज यांना रुग्णालयात दाखल केलं... आणि त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असतानाच रमेश अवचर यांनी थेट मॅथ्यूज यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला... आणि 55 वर्षांचा विरह संपला....

नातेवाईकांनी वर्गीस मॅथ्यूज यांना पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.... 55 वर्षात सगळं काही बदललं... मात्र मॅथ्यूज आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम काही कमी झालं नाही... आणि त्यामुळेच प्रचंड प्रेमाच्या ओढीमुळेच तब्बल 55 वर्षानी दोन भाऊ एकत्र आलेत, असंच म्हणावं लागेल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com