Travel Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Tips : तुमच्या मुलांसोबत ट्रिप प्लान करताय मग 'ह्या' गोष्टींची खबरदारी नक्की घ्या

Tips for travelling with kids : तुमच्या लहान मुलांसोबत ट्रिप प्लॅन करताय मग तुमच्या बॅगेत या सर्व गोष्टी आहेत का याची खात्री नक्की करून घ्या. नाही तर प्रवासात तुमची चांगलीच फजिती होऊ शकते.

Shweta Joshi

लहान मुलांसोबत प्रवास करणं हे खूपचं एक्साईटिंग आणि चॅलेजिंग असतं. पण परफेक्ट प्लॅनिंग कराल कर हा प्रवास तुमचा प्रवास अविस्मरणीय होऊ शकतो.

1. आवडती खेळणी सोबत घ्या

प्रवासात मुलांना कंटाळा आला की त्यांची चिडचिड होते. मग तुमचाही प्रवास त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे आठवणीने बाळाचे आवडते खेळणं सोबत ठेवा.

2. अतिरिक्त कपडे सोबत घ्या

लहान मुलं म्हणलं की, सतत खेळणं, धडपडणं आलचं. अनेक वेळा खाता पितानाही काहीना काही कपड्यांवर सांडत असतं. घरात असतानाच अनेकवेळा मुलांचे कपडे बदलावे लागतात. मग प्रवासात तर विचारायलाच नको. सगळा सावळा गोंधळ. अशा वेळी मुलांचे अतिरिक्त आणि Comfortable कपडे सोबत घ्यावेत. त्यांचे आवडीचे कपडे असतील तर लहान मुलंही खुश असतात. लहान मुलं खुश तर तुमचाही प्रवास आनंदाचा होतो.

3. आवडता खाऊ घ्या

प्रवास लांबचा असो की जवळचा, लहान मुलं सोबत असतील तर खाऊचा डबा सोबत हवाच. पोट भरलेलं असेल तर मुलांची चिडचिड होत नाही. खाऊच्या डब्यात ड्रायफ्रुट(dryfruit) शिरा, तुप साखर पोळी असा हलका खाऊ घेऊ शकता.

4. अतिरिक्त शुज

लहान मुलांसाठी अतिरिक्त शुज आणि मोजे सोबत असावेत. कधी थंडी वाजली तर मोजे सोबत असावेत. खेळण्यात शूज कधी हरवू शकतात तर तुटू शकतात. त्यामुळे अतिरिक्त शुज सोबत असले तर सोयीचं होऊल .

5. औषधे, प्रथमोपचार किट

लहान मुल म्हणलं की धडपड आलीच म्हणून प्रथमोपचार किट सोबत असावे. त्यात काही जखम झाली तर लावण्यासाठी मलम, बॅडेज् असावे. बेसिक ड्रेसिंगचं साहित्य किट मध्ये ठेवा. उलटी, ताप, सर्दीचं औषधे (Medicines)ही किटचा महत्त्वाचा भाग असावा. प्रवासात कधीही त्याची गरज पडू शकते.

6. HAND WASH, डायपर

लहान मुलांना खेळताना कुठेही हात लावायची सवय असते. अशावेळी हात पाय स्वच्छ राहावे म्हणून HAND WASH, सॅनिटायझर सोबत ठेवावे. अतिरिक्त डायपरही बॅगेत ठेवावेत.

7. क्रिम, टोपी

त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चराइजर असावे. तर उन्हापासून बचाव होण्यासाठी टोपी, स्कार्फ असावेत. डास चावू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी.

8. तिकिट, पासपोर्ट, कागदपत्रे

बस, ट्रेन,(Train) विमानाने आपण प्रवास करणार असाल, तर तुमच्या बाळाचं तिकिट सोबत घ्यायला विसरु नका. शिवाय बाळाचं आधारकार्डही आठवणीने सोबत घ्या. अनेक वेळा प्रवासात त्याची गरज भासू शकते.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT