Best Sleeping Position SAAM TV
लाईफस्टाईल

Best Sleeping Position : कोणत्या कुशीवर झोपणे योग्य डाव्या की उजव्या? वाचा तज्ज्ञांचे मत, मिळेल आरामदायी झोप

Left Side Sleeping Position Benefits : रात्री थकून भागून आल्यावर निवांत झोप प्रत्येकाला हवी असते. त्यामुळे शांत झोप मिळवण्यासाठी आपण कोणत्या कुशीवर झोपतो हे महत्त्वाचे असते. कोणत्या कुशीवर झोपणे योग्य डाव्या की उजव्या? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनातून रात्री निवांत झोप घेण्यासाठी प्रत्येक जण आतूर असतो. पणही झोप नीट घ्यावी. कारण झोपेच्या सवयींचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. शरीरातील सर्व कार्ये नीट सुरळीत पार पडण्यासाठी चांगली झोप घेण गरजेचे आहे.

झोपेमुळे शरीरात दिवसभर ऊर्जा राहते. झोपताना कधीही एका कुशीवर झोपावे. कारण यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. एका कुशीवर झोपल्यामुळे पाठीच्या वेदना कमी होतात. तज्ज्ञांचे मते कधीही डाव्या कुशीवर झोपावे. हे आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण यामुळे शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली राहते.

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

  • रात्री डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. अपचनाची समस्या उद्भवत नाही.

  • ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

  • हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच सांधेदुखी कमी करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपा.

  • डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

  • उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी आवश्य डाव्या कुशीवर झोपावे. यामुळे ब्लडप्रेशरची पातळी कमी होण्यास मदत मिळते.

  • डाव्या कुशीवर झोपल्यामुळे घोरणे बंद होते. कारण एअरवेज खुले राहिल्यामुळे टाळूला त्रास होत नाही आणि घोरणे बंद होते.

  • डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो आणि मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT