Heart blockage treatment saam tv
लाईफस्टाईल

Heart blockage treatment: हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलं अँजिओप्लास्टी करण्याची गरज कधी भासते

What Is Angioplasty: हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास अँजिओप्लास्टीची गरज भासते. ही प्रक्रिया रक्तपुरवठा सुधारण्यासाठी मदत करते. वेळेवर उपचार केल्यास जीव वाचू शकतो. अँजिओप्लास्टीनंतर जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाचे आजार म्हटलं की प्रत्येकाला भीती ही वाटतेच. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैलीमुळे लोकांना कमी वयातच हार्टच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. जेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशावेळी रूग्णाला अँजिओप्लास्टीची गरज लागू शकते. मॅक्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार आणि हृदयरोगतज्ञ डॉ. मनोज कुमार यांच्याकडून अँजिओप्लास्टीबद्दल माहिती दिली आहे.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

डॉक्टरांच्या मते, अँजिओप्लास्टी ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, हृदयातील बंद झालेल्या धमन्या उघडण्यासाठी एका नळीचा वापर केला जातो. या नळीला कॅथेटर म्हणतात. या नळीच्या टोकाला एक छोटा फुगा जोडलेला असतो, जो अडथळ्याच्या ठिकाणी फुगवला जातो. यामुळे धमन्या रुंद होतात आणि रक्ताभिसरण पहिल्याप्रमाणे होण्यास मदत होते.

कधी भासते अँजिओप्लास्टीची गरज?

धमन्यांमध्ये अडथळा आढळल्यास अँजिओप्लास्टीची आवश्यकता असते. वेळेवर केलेली अँजिओप्लास्टी रुग्णाचा जीव वाचवू शकते. या प्रक्रियेसाठी मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात.

डॉक्टरांच्या मते, जर हृदयाच्या धमन्यांमधील अडथळा मोठा असेल तर काही प्रकरणांमध्ये बायपास शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार, अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतात. अँजिओप्लास्टीनंतर रुग्णाने जीवनशैलीत बदल करणं खूप महत्त्वाचं असतं.

अँजिओप्लास्टीनंतर शरीरात करा हे बदल

अँजिओप्लास्टीनंतर रुग्णांनी जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. ज्यामध्ये संतुलित आहार, दररोज व्यायाम, धूम्रपान टाळणं आणि तणाव कमी करणं यांचा समावेश आहे. अडथळे पुन्हा निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी अँजिओप्लास्टीनंतर नियमित तपासणी करणंही महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT