Manasvi Choudhary
गावरान भाज्यापैकी एक म्हणजे कोहळा भाजी. कोहळा भाजीला पांढरा भोपळा म्हणून देखील ओळखले जाते.
अस्सल गावरान स्टाईल कोहळ्याची भाजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुम्ही घरच्या घरी ही पारंपारिक सोपी रेसिपी ट्राय करू शकता.
गावरान स्टाईल कोहळा भाजी बनवण्यासाठी कोहळा, कांदा, टोमॅटो, सुका खोबरा, शेंगदाण्याचा कूट, आलं- लसूण पेस्ट, कांदा- लसूण मसाला, हळद, मोहर, हिंग, कढीपत्ता, गूळ, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.
कोहळ्याची साले काढून आतील बिया काढा. कोहळ्याचे छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे स्वच्छ धुऊन एका प्लेटमध्ये ठेवा.
एका कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालून फोडणी द्या.
फोडणी तडतडल्यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा मिक्स करा. कांदा चांगला परतून घ्या. नंतर या मिश्रणात आलं- लसूण पेस्ट मिक्स करा.
मिश्रणात हळद, कांदा-लसूण मसाला मिक्स करा. मसाले चांगले एकत्र मिक्स करा म्हणजे भाजीला चांगली चव येईल.
नंतर या मसाल्यात बारीक केलेले कोहळ्याचे तुकडे मिक्स करा आणि भाजीवर झाकण ठेवा. भाजी चांगली शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
मिश्रणात पाणी मिक्स करून भाजी शिजवून घ्या. भाजी शिजली की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.