

आजार कोणताही असो त्याची काही ना काही लक्षणं ही आपल्याला दिसून येतात. काहीही गंभीर समस्या असेल तर शरीर त्याचे संकेत देत असतं. असं तुमचं शरीर तुम्हाला स्ट्रोक येण्यापूर्वी काही इशारा देत असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अनेकजण ही लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर तुम्हाला काय इशारे देत असतं ते जाणून घ्या. याची लक्षणं नेमकी काय आहेत ती पाहूयात.
स्ट्रोकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे चेहरा, हात किंवा पायाच्या एका बाजूला अचानक सुन्नपणा जाणवणं. अनेकजण हे थकवा, तहान किंवा तात्पुरता अशक्तता समजून दुर्लक्ष करतात. मात्र शरीराच्या एका बाजूला जाणवणारा सुन्नपणा मेंदूपर्यंत रक्तपुरवठा नीट न झाल्याचा संकेत असू शकतात. अशावेळी एका बाजूला मुंग्या आल्याप्रमाणेही वाटू शकतं.
अचानक बोलताना अडखळणं, शब्द नीट न उच्चारणं किंवा समोरच्या व्यक्तीचं साधं वाक्य समजण्यात अडचण येणं ही सर्व देखील स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. जास्त ताण किंवा लाईफस्टाईल बदलांमुळे हा परिणाम झाला असावा असं अनेकांचा समज होतो.
काही वेळा अचानक खूप तीव्र डोकेदुखी होते. लोक याला मायग्रेन किंवा अतिप्रमाणात ताण असल्यामुळे डोक दुखत असेल असं समजतात. पण हे मेंदूत रक्तस्राव होण्याचं लक्षण असू शकतं. साध्या डोकेदुखीपेक्षा ही वेदना अचानक सुरू होते आणि त्यासोबत उलट्या, चक्कर येणं किंवा दृष्टी कमी होणं यांसारखी लक्षणंही दिसू शकतात.
अचानक चक्कर येणं, नीट चालता न येणं किंवा शरीराचा समतोल बिघडणं हे अनेकदा लो ब्लड प्रेशर किंवा व्हर्टिगो समजून दुर्लक्षित केलं जातं. मात्र मेंदूतील समतोल राखणाऱ्या भागावर परिणाम झाल्यास अशी लक्षणं दिसू शकतात.
अचानक कमी दिसणं, दुहेरी दिसणं किंवा पूर्णपणे दृष्टी जाणं ही लक्षणं सहसा वेदनारहित असल्यामुळे लोक दुर्लक्ष करतात. काहीजण याला स्क्रीनचा ताण किंवा थकवा समजतात. पण मेंदूतील दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागात रक्तपुरवठा कमी झाल्यास असे बदल होऊ शकतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.