Heart Attack Prevention: चाळीशी पार केलीत? या १० सवयींनी कमी करा हार्ट अटॅकचा धोका

Prevent heart attack: 40 नंतर हृदयाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तज्ज्ञांनी सांगितलेल्या सवयी अंगीकारून निरोगी जीवन जगता येऊ शकते.
Heart Attack Prevention Tips
High cholesterol causesgoogle
Published On

आजच्या बिझी शेड्युलमध्ये आपण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये 40 वर्षांनंतर हृदयाची काळजी घेणं अधिक गरजेचं बनलं आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि शरीरातील नैसर्गिक बदल यामुळे चाळीशीनंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, काही सोप्या सवयी आहे ज्या तुम्ही जोपासल्या तर हा धोका कमी होण्यास मदत होते. योगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र के. शेट्टी यांनी कोणत्या सवयी सांगितल्या आहेत ते पाहूया.

दररोज व्यायाम गरजेचा

दररोज किमान 20 ते 30 मिनिटं वेगात चालणं, सायकल चालवणं, योग किंवा सूर्यनमस्कार करणं हृदयासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग

स्क्वॅट्स, भिंतीचा आधार घेऊन पुश-अप्स असे व्यायाम केल्यास स्नायू मजबूत होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांचा बीपी नियंत्रणात नाही त्यांनी हे व्यायाम तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावेत.

Heart Attack Prevention Tips
Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

फायबरयुक्त आहार

फळं, भाज्या, डाळी, सुका मेवा आणि बिया यांचा आहारात समावेश केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हे पदार्थ शरीरातील इन्फ्लामेशन कमी करतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्यापासून रोखतात.

पुरेशी आणि चांगली झोप घ्या

दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे. झोपण्याआधी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहणं फायद्याचं ठरतं. जर जोरात घोरण्याची सवय असेल तर त्याची तपासणी करून घ्यावी.

ताणतणावावर नियंत्रण ठेवा

दररोज किमान 10 मिनिटं ध्यान, प्राणायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम हृदयावर दिसतो. चक्कर येत असल्यास श्वासोच्छ्वासाचे व्यायाम हलक्या पद्धतीने करावेत.

पोटावरील चरबी कमी करा

पोटाभोवती वाढलेलं फॅट हार्ट अटॅकचा धोका वाढवतं. त्यामुळे गोड पदार्थ, तळलेलं अन्न आणि उशिरा जेवण करण्याची सवय टाळणं आवश्यक आहे.

Heart Attack Prevention Tips
Low Heart Rate: अचानक हार्ट रेट कमी होऊ लागला तर काय कराल? घरच्या घरी यावर उपाय शक्य आहेत का?

भरपूर पाणी पिण्याची सवय

दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. किडनीच्या रुग्णांनी पाण्याचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावं.

दारूचं सेवन मर्यादित ठेवा

सिगारेटमुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होतं तर मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे या सवयी कमी करणं किंवा पूर्णपणे सोडणं हृदयासाठी चांगलं ठरतं. त्याऐवजी हर्बल चहा सारखे पर्याय निवडावेत.

जेवणानंतर थोडं चालणं

जेवणानंतर 10 ते 15 मिनिटं चालल्याने रक्तातील साखर आणि चरबी नियंत्रणात राहते. जर गुडघ्यांचा त्रास असेल तर बसून पाय हलवण्याचा हलका व्यायाम करावा.

Heart Attack Prevention Tips
Heart oxygen deficiency: धाप लागतेय, थकवा जाणवतोय? हृदयाला रक्तपुरवठा न होणाऱ्या ४ लक्षणांकडे इग्नोर करू नका

नियमित हृदय तपासणी आवश्यक

40 वर्षांनंतर दरवर्षी हृदयाची तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा हृदयाशी संबंधित समस्या कोणतीही लक्षणं न दाखवता वाढत राहतात. नियमित तपासणीमुळे अशा समस्या वेळेत ओळखता येतात. यात लिपिड प्रोफाइल, ब्लड प्रेशर, HbA1c, ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि स्ट्रेस टेस्टचा समावेश असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com