Heart oxygen deficiency: धाप लागतेय, थकवा जाणवतोय? हृदयाला रक्तपुरवठा न होणाऱ्या ४ लक्षणांकडे इग्नोर करू नका

Poor blood flow heart: हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी झाल्यास छातीत दडपण, दम लागणं, थकवा आणि हृदयाचे ठोके वाढणं अशी लक्षणे दिसतात. ही संकेत वेळेत ओळखून योग्य उपचार केल्यास गंभीर हृदयविकार टाळता येऊ शकतात.
Heart oxygen deficiency
Heart oxygen deficiencySAAM TV
Published On

गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तरूणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय. मुळात आपल्या हृदयाला नीट काम करण्यासाठी सतत ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज असते. पण ज्यावेळी रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.

ज्यावेळी तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही तेव्हा शरीर काही ना काही लक्षणं देत असतं. ही लक्षणं ओळखून वेळेत उपाय करणं गरजेचं असतं. हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होत नसल्यास कोणते संकेत मिळतात ते पाहूयात

छातीत दडपण

छातीत दडपण किंवा छाती घट्ट वाटू लागणं ही हृदयाला रक्तपुरवठा होत नसल्याचे संकेत आहे. अनेकदा या वेदना हात, मान, जबडा किंवा पाठीत पसरू शकतात. काही वेळा ही वेदना सौम्य असली तरी ती दुर्लक्ष करण्यासारखी नसते.

Heart oxygen deficiency
Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

लगेच दम लागणं

थोडंसं चाललं, जिने चढलं तरी दम लागणं हेही गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. काही वेळा झोपेत असताना अचानक श्वास घेता न आल्याने जाग येते. अशावेळी तुमचं हृदय नीट रक्त पंप करू शकत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते.

थकवा आणि अशक्तपणा

जर तुम्हाला कोणतंही मेहनतीचं काम न करता तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यावेळी सतत थकल्यासारखं वाटणं, छोटं काम केल्यानंतरही एनर्जी नसल्यासारखं वाटणं याकडे दुर्लक्षित करू नये. शरीराला पुरेसं ऑक्सिजनयुक्त रक्त न मिळाल्याने स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो.

Heart oxygen deficiency
Throat cancer: 99 टक्के लोकं या लक्षणांकडे करतात दुर्लक्ष; घशाचा कॅन्सर झाल्यावर शरीर काय संकेत देतं वाचा

हृदयाचे ठोके वाढणं

हृदय जोरात धडधडणं, किंवा आराम करत असताना देखील हृदयाचे ठोके वाढणं हे धोक्याचे संकेत आहेत. हृदयाला योग्य ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ते जास्त वेगाने काम करण्याचा प्रयत्न करतं. ठोके चुकणं किंवा अचानक वाढणं याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Heart oxygen deficiency
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com