WhatsApp Username Feature google
लाईफस्टाईल

WhatsApp युजर्ससाठी गुड न्यूज! आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅटींग, जाणून घ्या सोपी ट्रिक

WhatsApp Username: व्हॉट्सअॅपच्या नवीन युजरनेम फीचरमुळे मोबाईल नंबर न दाखवता चॅटिंग करता येणार आहे. युजरनेम कसे सेट करायचे, त्याचे नियम आणि फायदे जाणून घ्या या सोप्या मार्गदर्शकातून.

Sakshi Sunil Jadhav

आता तुम्ही पुर्वीसारखं नंबर लॉगिन करताही WhatsAppचा वापर करू शकता. हे आपल्या आयुष्यातलं खूप महत्वाचं उपकरण झालं आहे. व्हिडीओ कॉल, फोटोज, स्टेटस या सगळ्यामुळे आपल्या बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शिवाय WhatsApp वापरायला एकमद सोपं अॅप आहे. यामध्ये आत्तापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. पण नंबरशिवायही चॅटींग करण्याचा बदल खूप मोठा आणि सोयीस्कर आहे.

पुढील माहितीत आपण WhatsAppचे युजरनेम कसे सेट करायचे? याबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुमचा नंबर लॉगिन आणि रिकवरीसाठी जोडलेला असेल तर दुसऱ्यांना तुमचा नंबर दिसणार नाही. चला जाणून घेऊयात सोप्या स्टेप्स.

WhatsAppमध्ये युजरनेम कसं सेट करायचं?

सर्वप्रथम तुम्ही Android किंवा iphone मध्ये WhatsApp अॅप डाऊनलोड करा. मग त्यामध्ये सेटिंग्जवर क्लिक करा. तिथे तुम्हाला तीन डॉट्स कोपऱ्याजवळ दिसतील. त्यावर क्लिक करा. मग तुमच्या प्रोफाइल नावावर क्लिक करा. त्याने तुमच्या अकाउंटची डिटेल्स दिसेल. मग त्यामध्ये तुम्ही Username या ऑप्शनवर क्लिक करा.

आता तुम्हाला जे युजरनेम ठेवायचंय ते सेट करून घ्या. हे युजरनेम ३ ते ३५ अक्षरांचे असलं पाहिजे, त्यात किमान एक अक्षर असलं पाहिजे आणि त्यात अक्षरे, अंक, टिंब (.) आणि _ वापरता येणार नाहीत. त्याची सुरुवात 'www' ने होता कामा नये, शेवट टिंबाने होता कामा नये. त्यात सलग दोन टिंब असू शकत नाहीत. तसेच, युझरनेमच्या शेवटी .com, .org, किंवा .in हे शब्द वापरू नयेत.

जेव्हा तुम्ही योग्य युझरनेम टाकता, तेव्हा व्हॉट्सॲप ते उपलब्ध आहे की नाही हे आपोआप तपासेल. तुम्हाला युझरनेम मिळाल्यावर फक्त सेव्ह किंवा डन वर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप नंबरच्या ऐवजी तुमचं युझरनेम इतरांना शेअर करू शकता. याने तुमचा पर्सनल क्रमांक देण्याचा त्रास संपेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT