

मुंबईकरांना आता पेट्रोल- डिझेलच्या खरेदीसाठी वेगळी बचत करावी लागणार आहे. कारण याचे वाढते दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. कालच्या दरांमध्ये एकूण आठ दिवसांमध्ये 4 रुपयांने वाढ झाली होती. हा आकडा आता वाढला आहे. २३ मे पासून हा दर १०७.६ रुपयांवरून १०८.५ रुपये प्रति लीटर झाला. तर डिझेलच्या किंमती ९४.१ रुपयांवरून ९५ रुपयांवर हा दर पोहोचला आहे.
पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम फक्त वाहन चालकांवर होणार नाही. तर वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर जास्त आर्थिक भार पडत आहे. तसेच याचा अंदाज घेता देशात महागाई वाढताना दिसत आहे. याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसणार आहे. पुढील माहितीत आपण मुंबईसह इतर शहरांमधील दर जाणून घेणार आहोत.
मुंबईत पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०८. ४५ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.०२ इतका आहे.
पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०८.९८ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.५७ रुपये इतका आहे.
नाशिकमध्ये पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.२९ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५. ८६ रुपये इतका आहे.
सोलापूरमध्ये पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.९५ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९६.५२ रुपये इतका आहे.
ठाण्यात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.३१ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.८५ रुपये इतका आहे.
कोल्हापूरमधील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९. ३६ आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.०५ इतका आहे.
दिल्लीतील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर ९९.५१ आहे. तर डिझेलचा आजचा दर ९२.५९ इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.