Sakshi Sunil Jadhav
गेल्या काही वर्षांत, देशभरात आणि जगभरात मानेच्या कॅन्सरची रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
डॉक्टरांच्या मते मानेच्या कॅन्सरची लक्षणं कोणालाच माहित नाहीत. त्यामुळे त्यांना या आजाराचे निदान होते. पुढील माहितीत आपण मानेच्या कॅन्सरची लक्षणं जाणून घेणार आहोत.
तुम्हाला सतत घसा खवखवल्यासारखं यामध्ये वाटू शकतं, आवाज बसतो, घोगरा होतो, गिळताना त्रास होते हे सर्वात मोठं लक्षण आहे.
तुम्हाला यामध्ये मानेत गाठ किंवा सूज येत. मान वळवताना त्रास होतो.
तुम्हाला गिळताना त्रास होतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे डाग दिसतात. रक्त येतं आणि सतत तोंडाचा वास येतो.
तुमचा कान यामध्ये दुखतो. अचानक वजनही कमी होतं आणि थकवा जाणवतो.
तुम्हाला मानेचा कॅन्सर टाळायचा असेल तर तंबाखू आणि गुटखा टाळा, मद्यपान टाळा.
तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा. अॅक्टीव्ह राहा आणि पुरेशी झोप घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.