Eating instant noodles every day saam tv
लाईफस्टाईल

Side effects of instant noodles: इंस्टंट नूडल्स रोज खाल्ले तर काय होईल? दररोजच्या सवयीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम

What happens if you eat noodles every day: इन्स्टंट नूडल्स तयार करायला सोप्या आणि खायला चविष्ट असल्यामुळे अनेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग बनल्या आहेत. पण, जर तुम्ही दररोज इन्स्टंट नूडल्स खात असाल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर (Health) गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • इंस्टंट नूडल्स पोषणयुक्त नसतात, फक्त भूक भागवतात.

  • एका पॅकेटमध्ये 600 ते 1500 मि.ग्रॅ सोडियम असते.

  • दररोज नूडल्स खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो

इंस्टंट नूडल्सला आज जगभरातील लोकांची पसंती आहे. कमी किमतीत मिळणारं, काही मिनिटांत तयार होणारे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारं हे खाद्य अनेकांसाठी खास आहे. विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत अभ्यास करताना, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना किंवा कमी बजेट असलेल्या कुटुंबांना इंस्टंट नूडल्सचं एक पॅकेट केवळ अगदी पोट भरल्यासारखं होतं.

पण या चवीच्या मागे एक प्रश्न उभा राहतो जर ही सोय दररोजची सवय झाली तर शरीरावर त्याचे काय परिणाम होतात? संशोधन सांगते की, नूडल्स तुमची भूक भागवतात खरी पण पोषणाची कमतरता मात्र भरून काढू शकत नाहीत.

नूडल्सच्या पॅकेटमध्ये काय असतं?

न्यूडल्सच्या एका पॅकेटमध्ये मैद्यापासून बनवलेल्या नूडल्स आणि चव वाढवणाऱ्या मसाल्याचं एक पाकिट असतं. काही ब्रँड्स यात सुकवलेली भाजी किंवा लसूणचे तुकडे घालतात, पण पोषणदृष्ट्या ते फारसं वेगळं नसतं. द कन्व्हर्सेशन या अभ्यासानुसार, एका पॅकेटमध्ये 600 ते 1500 मि.ग्रॅ. सोडियम असतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दिवसाला 2000 मि.ग्रॅ. पेक्षा जास्त सोडियम घेऊ नये असं सांगितलं आहे.

कधीतरी या न्यूडल्स सेवन केलं तर हरकत नाही, पण दररोज जास्त प्रमाणात मीठ शरीरातील हृदय, किडनी आणि रक्तवाहिन्यांवर ताण आणू शकतं. त्यातच प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वांचा अभाव असल्याने हे अन्न भूक भागवतं. पण शरीराला आवश्यक पोषण देत नाही.

जास्त नूडल्स खाल्ल्याचे धोके

कधीतरी रात्री उशिरा नूडल्स खाणं हानिकारक नाही पण जर ते रोजचं जेवण बनलं तर धोका वाढू शकतो. दक्षिण कोरियातल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा इंस्टंट नूडल्स खाल्ल्यास हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. विशेष म्हणजे महिलांमध्ये हा धोका अधिक आढळला. संशोधकांच्या मते हार्मोन्स किंवा पॅकेजिंगमधील रसायनं यामागे कारणीभूत असू शकतात.

या पॅकेटमधील न्यूडल्स मैद्याचे असून त्यामध्ये फायबरमध्ये कमी असल्याने पचनसंस्था कमकुवत होते. त्याचप्रमाणे टाईप 2 मधुमेह आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यात प्रोटीन (जसं की अंडी, टोफू किंवा चिकन) नसेल तर भूक पटकन भागते पण तितक्याच लवकर परत लागते.

नूडल्स आरोग्यदायी कसे बनवायचे?

खरं सांगायचं तर नूडल्स पूर्णपणे खाणं बंद करण्याची गरज नाही. काही छोट्या ट्रीक्सने ते पोषक बनवता येतात. मसाल्याच्या पुडीतलं मीठ कमी वापरणं, त्याऐवजी कमी मीठ असलेलं सूप किंवा मसाले वापरणं, भाजीपाला आणि हलक्या प्रोटीनचा त्यामध्ये समावेश करणं या गोष्टींमुळे मोठा फरक पडतो. काही ब्रँड्स आता संपूर्ण धान्याचे किंवा तळण्याऐवजी वाळवलेले नूडल्सही देतात, ज्यात फायबर जास्त असतं.

इंस्टंट नूडल्समध्ये किती सोडियम असते?

एका पॅकेटमध्ये 600 ते 1500 मि.ग्रॅ सोडियम असते.

इंस्टंट नूडल्सच्या अतिवापरामुळे कोणते आजार होऊ शकतात?

हृदयरोग, मधुमेह आणि आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

नूडल्समध्ये कोणत्या पोषक घटकांचा अभाव असतो?

प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वांचा अभाव असतो.

महिलांमध्ये नूडल्सचा अतिवापर का धोकादायक आहे?

हार्मोन्स आणि पॅकेजिंगमधील रसायनांमुळे धोका अधिक असतो.

नूडल्स आरोग्यदायी कसे बनवता येतील?

कमी मीठ, भाजीपाला आणि प्रोटीन मिसळून बनवता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Maharashtra Live News Update: - ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात निघाला बंजारा समाजाचा महामोर्चा.

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफा देण्याचे दाखवत २५ कोटींची फसवणूक; दीडशेहून अधिक नागरिकांनी केली गुंतवणूक

SCROLL FOR NEXT