Eye Dark circles saam tv
लाईफस्टाईल

Dark Circles: महागडे क्रीम कशाला? डार्क सर्कल्स कमी करण्याचे १० नैसर्गिक उपाय ठरतील बेस्ट

Skin Care: डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज ही सामान्य समस्या आहे. योग्य झोप, पाणी पिणे, नैसर्गिक फेस मास्क व जीवनशैलीत सुधारणा करून ही समस्या कमी करता येते.

Sakshi Sunil Jadhav

सुंदरता टिकवण्यासाठी महिला अनेक महागड्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. अर्थात यात पैसा तर जातोच पण प्रोडक्ट्समुळे पुन्हा तीच समस्या वाढत जाते. त्यातीलच एक समस्या म्हणजे डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स आणि सूज Eye Bags.बऱ्याच जणांना असं वाटतं की डार्क सर्कल्सचे कारण हे थकवा आहे. वाढत्या वयानुसार त्वचेची लवचिकता कमी होणे, फॅट पॉकेट्स, डोळ्यांच्या आकाराच्या रचनेत बदल, तसेच जीवनशैली या सर्व कारणांमुळे ही समस्या वाढू शकते. काहींना चहा किंवा झोप घेतल्यानंतर लगेच सूज कमी होते, पण काहींमध्ये ही समस्या कायम राहते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार डार्क सर्कल्स आणि सूज ही नैसर्गिक शेडो, फॅट पॉकेट्स, पिगमेंटेशन किंवा त्वचेच्या कमकुवतपणामुळेही होऊ शकते. वंशपरंपरा, वाढते वय, धूम्रपान, अनियमित झोप, जास्त मीठाचे सेवन यामुळे ही समस्या वेगाने वाढत जाते. डार्क सर्कल्स किंवा डोळ्यांखालील सूज येण्याची प्रमुख कारणं पुढील प्रमाणे आहेत.

१ वाढत्या वयानुसार त्वचेचा सपोर्ट कमी होणे.

२ डोळ्यांभोवती द्रव साठणे व सूज येणे.

३ हाडांच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या शॅडोज.

४ धूम्रपान, मद्यपान, अलर्जीज, अनियमित जीवनशैली.

डोळ्यांखाली सूज आणि वर्तुळे कमी करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय

आइस पॅक

थंड पाण्याचा कपडा किंवा आइस पॅक डोळ्यांवर ठेवल्याने तात्काळ सूज कमी होते.

पुरेशी झोप

दिवसातून किमान ७-९ तासांची झोप आवश्यक आहे.

डोळे उंचावर ठेवा

झोपताना डोक्याखाली एक उशी ठेवा, त्यामुळे द्रव साठणार नाही.

मीठाचे प्रमाण

जास्त मीठ व रात्री उशिराचे इतर थंड पेय टाळा. कारण ते सूज वाढवतात.

धूम्रपान बंद करा

धूम्रपानामुळे कोलेजन कमी होते व त्वचा पातळ होते.

अलर्जीजवर नियंत्रण ठेवा

तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अलर्जीजची लक्षणे कमी करा.

पाणी भरपूर प्या

डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी घ्या.

मद्यपान टाळा

अल्कोहोल शरीरात पाणी कमी करतं व सूज वाढवतो.

नैसर्गिक फेस मास्क वापरा

काकडी, अॅलोवेरा जेल किंवा थंड चहाच्या पिशव्या डोळ्यांवर ठेवणे फायदेशीर.

कंसीलरचा वापर करा

तात्पुरता मेकअप कंसीलर किंवा हायड्रेटिंग क्रीमने डोळ्यांखालील काळसरपणा झाकता येतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स किंवा सूज ही सामान्य समस्या असली तरी ती योग्य जीवनशैली, आहार, पुरेशी झोपे घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT