
सणसमारंभ म्हटलं की प्रत्येकाच्या घरात विविध कामांची लगबग राहते. घरी पाहुणे येतात त्यांच्याबरोबर वेळ घालवताना, तसेच त्यांचे आदरातिथ्य करताना आपण पूर्णतः दमून जातो. आपल्या शरीरात असलेला थकवा थेट आपल्या चेहऱ्यावर दिसतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात. त्यामुळे चेहऱ्याचे तेज कमी झाल्यासारखे वाटते.
काळी वर्तुळे आल्याने आपण चांगले दिसत नाही. चेहरा निस्तेज दिसत असल्याने अनेक महिला ही काळी वर्तुळे घालवण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप करतात. चेहऱ्यावर मेकअप केल्याने काही काळापुरते डार्क सर्कल्स हाईड होतात. मात्र असे केल्याने ते आणखी वाढतात सुद्धा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल्स घालवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
काकडीचे आईस क्यूब
काकडी आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. तसेच आईस क्यूब आपल्या चेहत्यासाठी गुणकारी आहेत. त्यामुळे डार्क सर्कल्स जास्त असल्यास काकडीचा रस करून घ्या. काकडीच्या ज्यूसमध्ये थोडे पिण्याचे पाणी मिक्स करा आणि त्याचे आईस क्यूब बनवून घ्या. या आईस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करा आणि डोळ्यांवर देखील आईस क्यूब फिरवत रहा. याने आराम पडेल.
काकडी फेस पॅक
तुम्ही आधी काकडीचे पातळ काप करून घ्या. दोन पातळ कप केल्यावर उरलेल्या काकडीचा बारीक चुरा करा. बारीक केलेल्या काकडीमध्ये थोडे मध, दही आणि बदाम देल मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे आहेत तेथे लावून घ्या. तसेच पातळ काप केलेली काकडी यावर ठेवा. हा पॅक डोळ्यांखाली दहा मिनिटे तरी ठेवा.
बटाट्याचा वापर
डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकता. त्यासाठी सुरुवातीला बटाट्याच्या बारीक चकत्या करा. या चकत्या डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर ठेवा. दुसरा पर्याय म्हणजे बटाट्याची साल काढून घ्या. त्यानंतर बटाटा मिक्सरला बारीक करून घ्या. किंवा तो बारीक किसून घ्या. पुढे यामध्ये मध मिक्स करा. तसेच दही आणि बदाम तेल मिक्स करा. ही सर्व पेस्ट डोळ्यांवर लावा. अवघ्या दहा मिनिटात तुम्हाला डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे कमी झाल्याचे दिसेल.
वर दिलेले सर्व उपाय तुम्ही करू शकता. यामध्ये बदाम तेलाचा समावेश असल्याने लवकरात लवकर आराम मिळेल.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.