Real cause of breast pain saam tv
लाईफस्टाईल

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Breast pain related to menstrual cycle: स्तनांमधील वेदना ही अनेक महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. ही वेदना अनुभवताच महिलांच्या मनात सर्वप्रथम ब्रेस्ट कॅन्सरची (Breast Cancer) भीती येते.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांना एक जाणवणारी समस्या म्हणजे अचानक स्तनांमध्ये होणाऱ्या वेदना. काही महिलांना अचानक स्तनांमध्ये वेदना जाणवू लागतात. या वेदना तात्पुरत्या आणि सामान्य वाटतात. पण यामागे नेमकी काय कारणं आहे ते अनेकींना माहिती नसतं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जीवनशैलीतील बदल, हार्मोनल बदल किंवा सूज यामुळे या वेदना असू शकतात. परंतु यामागे गंभीर आरोग्याचेही संकेत असतात.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, स्तनांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे महिला दुर्लक्ष करतात. पण याची कारणं शोधली तर त्यावर उपचार करणं सोपं जातं.

हार्मोनल बदल हे प्रमुख कारण

महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भधारणा किंवा पेरिमेनोपॉजच्या काळात हार्मोनल चेंजेस होतात. म्हणजेच एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होतो. या बदलांमुळे स्तनाच्या टिश्यूंमध्ये पाणी साचतं. परिणामी सूज, स्तनांमध्ये जडपणा येणं किंवा ताणासारखी वेदना जाणवतात. मासिक पाळीनंतर ही वेदना आपोआप कमी होते. अशा प्रकारच्या वेदनांना cyclical pain असं म्हणतात.

सिस्ट किंवा फायब्रोसिस्टिक बदल

स्तनांमध्ये लहान द्रव पदार्थाच्या गाठी तयार होऊ शकतात. या सिस्टवर दाब पडल्यास वेदना होते. फायब्रोसिस्टिक बदल हे महिलांमध्ये सामान्य असून ते कॅन्सरशी संबंधित नसतात. मात्र जर स्तनात गाठ जाणवली किंवा तिचा आकार बदलत असेल तर अल्ट्रासाऊंड किंवा इतर तपासण्या करून खात्री करणं आवश्यक आहे.

इन्फेक्शन

स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये मिल्क डक्टमध्ये कधी-कधी अडथळले येतात. यामुळे त्या भागात वेदना, सूज, लालसरपणा होऊ शकतो. यामध्ये महिलेला सौम्य प्रमाणात तापही येऊ शकतो. याला मॅस्टायटिस म्हणतात.

मांसपेशी संबंधित वेदना

कधी-कधी स्तनांमध्ये होणाऱ्या वेदना ही प्रत्यक्षात छातीच्या मांसपेशी किंवा मज्जातंतूंशी संबंधित असतात. जड वस्तू उचलणं, व्यायामात जास्त जोर लावणं किंवा दुखापत झाल्यास अशा वेदना होऊ शकतात. ही वेदना स्पर्श किंवा विशिष्ट हालचालींमुळे वाढते.

औषधे किंवा हार्मोनल उपचार

काही औषधे जसं की, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा काही अँटीडिप्रेशन औषधं स्तन अधिक संवेदनशील बनवू शकतात. जर नवीन औषध सुरू केल्यानंतर वेदना जाणवू लागली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर स्तनदुखी वारंवार होत असेल, दीर्घकाळ टिकत असेल किंवा त्यासोबत गाठ, निप्पलमधून स्राव, त्वचेचा रंग बदलणें या तक्रारी जाणवत असतील तर ही लक्षणं दुर्लक्षित करू नयेत. कोणत्याही प्रकारची स्तनदुखी, अगदी सौम्य असली तरी, तपासणी करून कारण शोधणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव! ६१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

आरक्षण सोडतीत फिक्सिंग, OBC प्रवर्गातील महिलांवर अन्याय, महापालिका आरक्षणावरून वाद पेटला

Maharashtra Live News Update: विकास गोगावले प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच मोठ विधान

Crime News: १९ बाटल्या बिअर आणि दोन मित्र...; पार्टी गाजवली, मात्र 'ती' एक चूक महाग पडली, दोघांची जीवनयात्रा संपली

मोठी बातमी! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? निकाल लवकरच... अंतिम सुनावणी कधीपासून... VIDEO

SCROLL FOR NEXT