
सुगंधी मेणबत्त्या हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.
प्लास्टिकच्या कटिंग बोर्डमुळे सूक्ष्मप्लास्टिक अन्नात मिसळते.
ओरखडे भांडीतून घातक रसायने अन्नात जातात.
स्वच्छ, नीटनेटकं घर असलं तरी ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नजरेआड दडलेल्या असतात. रोजच्या वापरातील काही साध्या दिसणाऱ्या काही गोष्टी देखील पचनसंस्थेला त्रास देऊ शकतात किंवा एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांत प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी १२ सप्टेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये तीन घरगुती गोष्टींबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या गोष्टी त्वरित घरातून बाहेर टाकल्या गेल्या पाहिजेत.
डॉ. सौरभ म्हणतात, अनेक मेणबत्त्यांत फ्थॅलेट्स असतात, जे शरीरातील हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात. तसंच पॅराफिन मेण जळताना धूर आणि घातक VOC निर्माण करते. हे रसायन ऍलर्जी, श्वसनाचे विकार वाढवू शकतात आणि दीर्घकाळात आतड्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम करू शकतात.
त्याऐवजी गंधरहित सोयाबीन, नारळ किंवा मधमाश्यांच्या मेणाच्या मेणबत्त्या, ज्या अधिक स्वच्छ जळतात आणि रोजच्या वापरासाठी सुरक्षित ठरतात.
डॉ. सेठी यांच्या मते, “सतत चाकू फिरवल्यामुळे फळांवर सूक्ष्म खुणा पडतात आणि त्यातून अन्नात बारीक प्लास्टिकचे कण मिसळतात. अनेक वर्षांच्या वापराने हा धोका अधिक वाढतो. हे सूक्ष्मप्लास्टिक शरीरात साचू शकतात आणि दीर्घकाळात आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात.
यासाठी ते उत्तम पर्याय म्हणून नीट सांभाळलेले लाकडी किंवा बांबूचे कटींग बोर्ड्स फळं वापरण्याची सूचना करतात
जुनी नॉन-स्टिक भांडी बहुतेक वेळा PFOA नावाच्या रसायनाने तयार केली जातात. जे प्रजनन आणि संप्रेरकांच्या समस्यांशी संबंधित आहे. आधुनिक नॉन-स्टिक भांडी PFOA विरहित असली तरी त्यावर ओरखडे पडल्यास सूक्ष्म थर तयार होतो आणि त्यात मिसळलेलं इतर रसायन अन्नात जाऊ शकतात.
स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न किंवा शुद्ध सिरॅमिकची भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी आणि दीर्घकाळच्या आरोग्यासाठी अधिक योग्य आहेत.
सुगंधी मेणबत्त्यांमध्ये कोणते घातक रसायन असते?
फ्थॅलेट्स आणि पॅराफिनमुळे घातक VOC निर्माण होतात.
प्लास्टिकच्या कटिंग बोर्डचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
सूक्ष्मप्लास्टिक अन्नात मिसळून आतड्यांवर परिणाम करते.
जुन्या नॉन-स्टिक भांड्यांमध्ये कोणते रसायन धोकादायक आहे?
PFOA रसायन प्रजनन आणि हार्मोन समस्या निर्माण करते.
सुरक्षित मेणबत्त्यांसाठी कोणते मेण वापरावे?
सोयाबीन, नारळ किंवा मधमाशीचे मेण वापरावे.
आरोग्यासाठी सर्वोत्तम कटिंग बोर्ड कोणते?
लाकडी किंवा बांबूचे कटिंग बोर्ड सर्वोत्तम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.