
सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. पण तुम्हाला माहितीये का प्रत्येक तीन कॅन्सरपैकी एक कॅन्सर फक्त जीवनशैलीतील साध्या बदलांनी टाळता येऊ शकतो? आनुवंशिक कारणं काही प्रमाणात जबाबदार असली तरी आपली दैनंदिन सवय मोठी भूमिका बजावते.
आपण काय खातो, किती हालचाल करतो, अगदी आपण किती वेळ झोपतो, या छोट्या-छोट्या गोष्टी भविष्यातील आरोग्यावर परिणाम घडवतात. ऑंकोलॉजिस्ट डॉ. साद्विक राघुराम यांनी काही सोप्या जीवनशैलीच्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्याचा कुणीही सहज अवलंबू शकतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
डॉ. साद्विक यांनी म्हटलंय की, “प्रत्येक तीन कॅन्सरपैकी एक टाळता येतो. ना जादूने, ना डोंगर चढून तर तो केवळ सवयींनी. या पाच छोट्या पण शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेल्या बदलांनी आपण आजपासूनच धोका कमी करू शकतो.
प्रोसेस्ड फूड्स अन्नपदार्थ आणि रेडीमेड मांसाहारी पदार्थ शरीरात इन्फ्लामेशन वाढवतात आणि कॅन्सरचा धोका वाढवतात. सॉसेज, बेकन, पॅकेज्ड स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ कमी करून त्याऐवजी भाज्या, फळं आणि संपूर्ण धान्यांचा समावेश केल्यास शरीर जास्त निरोगी राहते.
अतिनील किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असतो. म्हणूनच उन्हाळा, हिवाळा, ढगाळ वातावरण, अगदी घरात खिडकीजवळ बसताना देखील सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे. टोपी, सनग्लासेस किंवा पूर्ण बाह्याचे कपडे वापरल्यास अधिक संरक्षण मिळते.
दररोज किमान अर्धा तास हालचाल करणं आवश्यक आहे. चालणं, सायकल चालवणं, व्यायामशाळा, नृत्य, किंवा फक्त कुत्र्यासोबत फिरणंही उपयोगी ठरतं. छोट्या सवयी जसं की जिन्याचा वापर किंवा थोड्या-थोड्या वेळाने पायी चालणं यामुळेही शरीराची हालचाल वाढते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो आणि उर्जाही वाढते.
सतत बसून राहिल्याने अनेक दीर्घकालीन आजारांसह कॅन्सरचाही धोका वाढतो. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने उठणं, चालणं, स्ट्रेचिंग करणं किंवा हलका व्यायाम करणं आवश्यक आहे. या छोट्या हालचाली रक्तप्रवाह सुधारतात.
रोज ७–८ तासांची शांत झोप शरीरासाठी गरजेची आहे. यामुळे ताण कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर दुरुस्तीची प्रक्रिया नीट पार पडते. याशिवाय झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करा. ठराविक वेळी झोपायला जाण्याची सवय लावा आणि शांत, आरामदायी वातावरण तयार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.