जेव्हा शरीरात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा सूज येते तेव्हा शरीर स्वतः त्याविरुद्ध लढण्यासाठी तत्पर होतं. या प्रक्रियेदरम्यान लीव्हर एक विशेष प्रकारचे प्रोटीन तयार करतं. यालाच सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (C-Reactive Protein) किंवा सीआरपी म्हणतात. शरीरात हे प्रोटीन वाढल्याने सूज किंवा इन्फेक्शनचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळेच डॉक्टर अनेकदा रुग्णांना सीआरपी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. ही एक साधी Blood Test असली तरी तो अनेक गंभीर आजारांचे संकेत देऊ शकतो.
सीआरपी टेस्ट काय आहे?
सीआरपी टेस्टमध्ये रक्तामध्ये असणाऱ्या या प्रोटीनचे प्रमाण मोजले जाते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, शरीरात इन्फेक्शन, जखम किंवा सूज झाली की लिव्हर लगेचच सीआरपीचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो.
सीआरपीचे प्रमाण शरीरात वाढणे हे गंभीर संसर्गांचे संकेत असू शकतात. उदाहरणार्थ, सेप्सिस सारख्या आजारात सीआरपीचे प्रमाण वेगाने वाढतं. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, हा टेस्ट शरीरातील सूज किती प्रमाणात आहे. हे समजून घेण्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरते.
याशिवाय ऑटोइम्यून आजारांमध्ये जसे की रूमेटॉइड आर्थरायटिस आणि ल्युपस शरीर स्वतःच्या पेशींवर हल्ला करतं. अशा स्थितीतही सीआरपीचे प्रमाण वाढलेले दिसते आणि त्यामुळे आजाराची तीव्रता किती आहे हे समजू शकता.
तसेच, आंतड्यांच्या आजारांमध्ये Inflammatory Bowel Disease सीआरपी वाढलेलं आढळतं. याशिवाय, एचएस-सीआरपी नावाचा एक विशेष प्रकारचा टेस्ट हृदयाच्या आरोग्याचा अंदाज लावण्यासाठी केला जातो. या तपासात सीआरपीचे प्रमाण सतत वाढलेले असल्यास ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज असल्याचे आणि भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढण्याचं संकेत देतं.
कोणत्या वयात करावी सीआरपी टेस्ट?
प्रत्येक व्यक्तीला ही टेस्ट नियमित करणे आवश्यक नसते. मात्र एखाद्याला वारंवार संसर्ग होत असेल, सतत ताप येत असेल, थकवा जाणवत असेल किंवा सांधेदुखी, सूज यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टर सीआरपी टेस्ट सुचवू शकतात. ३० ते ४० वर्षांच्या वयानंतर एचएस-सीआरपी टेस्ट अधूनमधून करणे फायद्याचे ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.