Sakshi Sunil Jadhav
सणासुदीच्या काळात पुरणपोळीचं वेगळं आकर्षण असतं. पण, प्रत्येकालाच चनाडाळीचं पुरण आवडतं असं नाही. म्हणूनच आज जाणून घेऊया शेंगदाण्याच्या पुरणपोळीची सोपी आणि झटपट रेसिपी. ही पोळी चविष्ट, पौष्टिक आणि बनवायला अगदी सोपी आहे.
१ कप भाजलेले शेंगदाणे, अर्धा कप गूळ, थोडं वेलदोडा पूड, चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप.
गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा एकत्र करून थोडं तेल टाकून मऊ पीठ मळून घ्या.
शेंगदाणे सोलून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात किसलेला गूळ आणि वेलदोडा पूड टाका.
गॅसवर हे मिश्रण थोडं गरम करून एकत्र करा, जेणेकरून गूळ नीट वितळेल आणि पुरण घट्ट होईल.
मळलेल्या पीठाचे समान आकाराचे गोळे करून ठेवा.
प्रत्येक गोळ्याला थोडं पिठ लावून छोटं पुरीसारखं लाटून त्यात पुरण भरा.
पुरण भरल्यानंतर गोळा बंद करून पुन्हा हलकं लाटून गोल पोळी तयार करा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
तयार शेंगदाणा पुरणपोळी गरम तूपासह सर्व्ह करा. चवीला ती अगदी लज्जतदार लागते.