Sakshi Sunil Jadhav
मॅगी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जाणार पदार्थ आहे. मॅगी बनवायला सगळ्यात कमी वेळ लागतो.
मॅगीच्या जाहीराती नुसार ती २ मिनिटांत सुद्धा तयार केली जाते. पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने केल्याने तीची चव बिघडते.
पुढे आपण ५ सोप्या पद्धतीने टेस्टी मॅगी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
चीज मॅगी बनवायला साधी सोपी आहे. त्यासाठी पातेल्यात पाणी घेऊन मॅगी उकळवा. मग एका पॅनमध्ये बटर घालून भाज्या मिक्स करा. शेवटी चीज टाकून सर्व्ह करा.
कोरियन मॅगी बनवण्यासाठी पाण्यात मॅगी उकळवून घ्या. त्यामध्ये चिली फ्लिक्स, ब्लॅक पेपर पावडर, लाल तिखट मिक्स करा. मसाल्यांवर गरम तेल टाकून मॅगी मिक्स करा.
वेज मॅगी बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यामध्ये मॅगी उकळवून घ्या. भाज्या घाला. वरून मसाला टाकून सर्व्ह करा.
सर्दीमध्ये तुम्ही सूप मॅगी तयार करू शकता. त्यासाठी मॅगी उकळवून घ्या. त्यामध्ये मसाले मिक्स करा आणि मॅगीत पाण्याचा वापर जास्त करा. ही मॅगी स्लो गॅसवर शिजवा आणि सर्व्ह करा.
मॅगी भेळ बनवण्यासाठी एका तव्यात मॅगीचे छोटे छोटे तुकटे रोस्ट करा. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.