Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न विदर्भ प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं चिखलदरा हे सध्या गुलाबी थंडीने नटलेलं आहे. 'विदर्भाचे नंदनवन' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
चिखलदरा हे सातपुड्याच्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे ३५६४ फूट उंचीवर वसलेलं आहे. त्यामुळे तिथली हवा अत्यंत थंडगार आहे.
गेल्या दोन दिवसांत तापमान २५ अंशांवरून २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
तळोदा, धडगाव आणि मोलगी परिसरासह संपूर्ण सातपुडा पट्ट्यात दाट धुक्याने वातावरण नयनरम्य झालं आहे. महाराष्ट्रात फिरण्यासाठी हा बेस्ट ऑपशन आहे.
हिरव्यागार दऱ्या, उंच उंच झाडं, आणि ढगांनी वेढलेला डोंगर या सर्वामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळत आहे. मुलांना पिकनिकला घेऊन जाण्यासाठी हा स्पॉट बेस्ट ठरू शकतो.
मेळघाट अभयारण्यात वाघ, अस्वले, मोर आणि रानकोंबड्यांसारखे प्राणी पाहायला मिळतात. तुम्ही वाइल्डलाइफ फोटोग्राफर्ससाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातील काही थंड भागांपैकी चिखलदऱ्यात कॉफीची शेती केली जाते. जी पर्यटकांसाठी नवी आकर्षक ठरते.
मुंबई, पुणे किंवा नाशिकहून अमरावती किंवा नागपूरमार्गे चिखलदऱ्याला पोहोचता येते. बस तसेच खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.