Soft Idli Recipe: इडली चिकट, वातड होतेय? मग पिठात 'हा' १ पदार्थ वापरा; मऊ लुसलुशीत होतील इडल्या

Sakshi Sunil Jadhav

प्रसिद्ध नाश्त्याची डीश

इडली ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध डिश असली तरी आता ती सगळीकडे लोकप्रिय झाली आहे. मात्र अनेकदा घरी बनवलेली इडली जाड, घट्ट किंवा कोरडी होते.

Soft Idli Recipe | google

पिठाची योग्य पद्धत

तुम्हालाही जर हॉटेलसारखी मऊ, लुसलुशीत इडली बनवायची असेल तर फक्त पिठात तेल घालण्याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक आहे.

Soft Idli Recipe | google

डाळ आणि तांदूळ भिजवा

इडलीसाठी १ भाग उडीद डाळ आणि २ भाग तांदूळ भिजवावा. डाळ ४ तास आणि तांदूळ ६-८ तास भिजल्यास पीठ चांगले फुलतात.

Soft Idli Tips | saam tv

मिक्स करताना तेलाचा वापर करा

डाळ आणि तांदूळ एकत्र वाटताना थोडं तेल घालल्यास मिश्रण हलकं आणि मऊ राहतं. यामुळे इडली वाफेत छान फुलते.

Soft Idli Tips | saam tv

किचन टिप्स

पीठ रात्रभर कोमट जागी ठेवा. त्यावेळी त्यावर एक-दोन थेंब तेल शिंपडल्यास पीठ कोरडं होत नाही आणि चांगलं फुलतं.

Soft Idli Tips | saam tv

मोल्डला तेल लावा

इडली साच्यांना हलकं तेल लावल्याने इडली चिकटत नाही आणि आकार व्यवस्थित राहतो. तसेच बाहेरून एकसारखी मऊपणा मिळतो.

Soft Idli Tips | saam tv

पिठात हे पदार्थ वापरा

थोडं नारळाचं तेल किंवा तूप इडलीच्या पिठात घातल्याने सुगंध आणि चव दोन्ही वाढते. तसेच इडली अधिक हलकी आणि फुलकी होते.

Soft Idli Tips | saam tv

वाफवताना ही चूक टाळा

झाकणावर पाणी ठेवले तर इडलीवर ओलावा साचतो आणि ती चिकट होते. म्हणून झाकण व्यवस्थित पुसूनच ठेवा.

Soft Idli Tips | saam tv

वेळेपुरतीच वाफ द्या

इडलीला १०-१२ मिनिटांपेक्षा जास्त वाफ देऊ नका. जास्त शिजल्यास इडली कोरडी होते आणि मऊपणा जातो.

Idli | yandex

इडल्या लगेच बाहेर काढू नका

वाफ बंद केल्यानंतर २ मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे इडली स्वतःच्या वाफेने स्थिर होते आणि हाताळायला सोपी होते.

idli | google

NEXT: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Farsan Bhaji Recipe
येथे क्लिक करा