Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

Brain Care: ३५ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकार झाल्यास भविष्यात डिमेन्शियाचा धोका वाढतो, असं यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासात आढळलं आहे. नियमित तपासणी अत्यंत गरजेची आहे.
Brain Care
Dementia Risksaam tv
Published On
Summary

३५ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकारामुळे डिमेन्शियाचा धोका ३८% ने वाढतो.

ट्रोपोनिन प्रोटीनचे वाढलेले प्रमाण मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करते.

एमआरआय स्कॅनमध्ये मेमरी सेंटर लहान होण्याचे संकेत आढळले.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष देणं कठीण झालं आहे. मध्यम वयात म्हणजेच ३५ ते ४५ वर्षांच्या वयोगटातील लोकांना याचा जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या वयोगटातील लोक काही सामान्य लक्षणांना दुर्लक्ष करतात. मात्र या छोट्या चुका त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकततात. यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या नव्या अभ्यासात असं आढळलं आहे की, मिड एजमध्ये झालेल्या हार्टच्या समस्यांचा थेट परिणाम भविष्यात मेंदूच्या कार्यावर होतो.

संशोधनात जवळपास ६ हजार ब्रिटिश नागरिकांचा २५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींवर रिसर्च केला गेला. सुरुवातीला या व्यक्तींना ना डिमेंशिया होता ना हार्टचा त्रास. मात्र ज्यांच्या रक्तात ट्रोपोनिन नावाचं प्रोटीन जास्त होतं अशा व्यक्तींमध्ये पुढील काळात डिमेन्शियाचा धोका तब्बल ३८ टक्क्यांनी जास्त असल्याचं दिसून आलं.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ट्रोपोनिन हे प्रोटीन हृदयातील स्नायूंना हानी पोहोचल्यावर वाढतं. जेव्हा हार्टची कार्यक्षमता कमी होते तेव्हा मेंदूपर्यंत जाणाऱ्या रक्ताचा आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुद्धा कमी होतो. त्यामुळे भविष्यात ब्रेन सेल्स आणि मेमरी सेंटरवर परिणाम होतो. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते आणि डिमेन्शियाचा धोका वाढतो.

Brain Care
Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

पुढे संशोधनात काहींच्या एमआरआय स्कॅनमध्ये असे दिसले की, ज्यांचा ट्रोपोनिन लेव्हल जास्त होता, त्यांच्या मेंदूमधील मेमरी सेंटर छोटा झाला होता आणि ग्रे मॅटरही कमी झालं होतं. त्यांची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वयानुसार दोन वर्षांनी कमी झाल्याचं आढळलं. हार्टची तपासणी फक्त वृद्धांसाठीच नाही तर ३५ ते ६० वयाच्या व्यक्तींनीदेखील नियमितपणे करून घ्यायला हवी. कारण या वयात घेतलेली काळजी पुढील काळात मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Brain Care
Satpura Tourism: धुक्याने नटलेले सातपुडा; ‘विंटर वंडरलँड’ पाहण्यासाठी लोकांची उसळली गर्दी
Q

३५ ते ४५ वयात हृदयविकार झाल्यास डिमेन्शियाचा धोका कसा वाढतो?

A

हृदयाच्या स्नायूंना झालेल्या हानीमुळे मेंदूपर्यंत जाणाऱ्या रक्ताचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे मेंदूच्या सेल्सवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होते.

Q

ट्रोपोनिन प्रोटीन म्हणजे काय?

A

ट्रोपोनिन हे प्रोटीन हृदयाच्या स्नायूंना इजा झाल्यावर वाढतं. त्याचा जास्त स्तर मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो.

Q

या संशोधनात काय निष्कर्ष निघाले?

A

ट्रोपोनिन लेव्हल जास्त असलेल्या लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका तब्बल ३८% अधिक असल्याचं आढळलं. त्यांची स्मरणशक्ती दोन वर्षांनी कमी झाली होती.

Q

कोणती काळजी घ्यावी?

A

नियमित हार्ट चेकअप, संतुलित आहार, व्यायाम आणि स्ट्रेस कमी ठेवणं महत्त्वाचं आहे. ३५ वर्षांनंतर हृदय तपासणी नियमित करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com