Health Risks : MRI करण्याआधी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर पडेल महागात

Health Risks MRI Scan Safety Tips : MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, यामध्ये एका प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट असते. तसेच यात पावरफूल विद्यूत उपकरणे आणि रेडिओ लहरींच्या साहाय्याने शरीराच्या आतील भागांची चित्रे आपण पाहू शकतो.
Preparing for an MRI scan
Precautions before MRI scan Google
Published On

MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, यामध्ये एका प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट असते. तसेच यात पावरफूल विद्यूत उपकरणे आणि रेडिओ लहरींच्या साहाय्याने शरीराच्या आतील भागांची चित्रे आपण पाहू शकतो. याने आपल्या शरीराला कोणत्या रोगाची लागण झाली आहे याची माहिती मिळते. जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असेल तर त्याची योग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर MRI करायचा सल्ला देतात. मात्र MRI करताना काही महत्वाच्या गोष्टींची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.

MRI स्कॅन केल्याने साइड इफेक्ट्स होतात का?

आतापर्यंत MRI स्कॅन केल्यामुळे साइड इफेक्ट्सच्या घटना खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. मात्र MRI करताना वाटणारी अस्वस्थता, डोके दुखी, शरीरात जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो. यामुळे काही वेळा डोळ्यांना खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र त्या तेवढ्याच काळापुर्ती होतात. MRI केल्यानंतर काही आणखी समस्या जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Preparing for an MRI scan
Makar Sankranti Recipes : मकर संक्रांतीला बनवा 'हे' पारंपारिक बाजरीचे गोड वडे

MRI चाचणी करण्यापुर्वी या गोष्टी तपासण विसरू नका.

काही खात असाल तर...

MRI स्कॅन करायला जाण्याआधी काही गोष्टींचे नियम पाळावे लागतात. ही टेस्ट करण्याआधी 2 ते 4 तास आधी काहीचं खाल्ल नाही पाहिजे. त्यावेळेस पोट रिकाम असेल तर तुमचे स्कॅनिंग व्यवस्थित होते आणि आजार ओळखायला मदत होते.

रुग्णाला दम्याचा त्रास असेल तर....

जर रुग्णाला दमा किंवा कोणत्या आजाराची लागण असेल झाली असेल तर डॉक्टरांना या विषयी आधीच सांगा. शिवाय तुम्हाला कोणत्या पदार्थांच्या सेवनाने अ‍ॅलर्जी होत असेल तर तुम्ही त्यासंबंधीत माहिती डॉक्टरांना सांगितली पाहिजे. त्यामुळे भविष्यात येणारा धोका तुम्ही टाळू शकता.

कपडे किंवा दागिने अंगावर असतील तर...

MRI स्कॅन करण्यासाठी खूप पावरफूल मशीनचा वापर केला पाहिजे. त्यात कोणत्याही धातूपासून तयार केलेल्या बारिक दागिना आकर्षित करू शकतो. जेव्हा तुमचे शरीर मशीनमध्ये ठेवता तेव्हा धातू, कपड्यांचा वापर करणे टाळले पाहिजे. नाहीतर ती मशीन तुम्हाला एका झटक्यात खेचून घेऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Preparing for an MRI scan
Modern Relationships : मुली सासू-सासऱ्यांसोबत राहायला नकार का देतात? जाणून घ्या महत्वाचं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com