Laughter Yoga Saam Tv
लाईफस्टाईल

Laughter Yoga: आठवडाभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी कुटुंबासोबत करा हा योगा, मनालाही प्रसन्न वाटेल

Manasvi Choudhary

Morning Yoga Tips: रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे महिला व पुरूष दोघांनाही ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. मात्र यावर हास्ययोग व्यायामाने मात करण्यास मदत होईल. हास्य योगा प्रकाराने शरीराला अनेक फायदे होतात. हास्य हे व्यक्तीच्या जीवनातला आनंद द्विगुणित करते व आजारांपासून दूर ठेवते. नियमितपणे हास्य योगा केल्याने मन व चेहरा प्रसन्न राहतो. तसेच विचार करण्याची क्षमता वाढते. संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटते.

हास्य योगाप्रकार करताना दिर्घश्वास घेत हवा मुखावाटे बाहेर घेत सोडली जाते. छाती आणि पोट हवेने भरल्यावर स्नायूं हे आकुंचन आणि प्रसारणाने तोंडावाटे 'हा हा, हो हो, हॉ हॉ' असा नाभीपासून आवाज करत बाहेर फेकतात. हास्य योगा केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

हास्य योगाचे प्रकार व फायदे (Laughter Yoga Types And Benefits)

१) मंद हास्य

मंद हास्य म्हणजे एखादी व्यक्ती भेटल्यानंतर एक छोटीशी स्माईल दिली जाते त्याला मंद हास्य म्हणतात. मंद हास्य केल्यावर गाल, ओठ या अवयवांच्या स्नायूंचा योग्य व्यायाम होतो.

२) मोठ्याने हसणे

मोठ्याने हसण्याने घसा आणि पडजिभेच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

३)पूर्णशक्तीनिशी होणे

पूर्णशक्तीनिशी हसण्याने शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात. मेंदूचे कार्य चांगले होते.

४)रावणहास्य

पोट कमी करण्यासाठी हे हास्य केले जाते. ज्यात खाली वाकून दोन्ही हात पसरून 'हा - हा' आवाज करत मोठ्याने हसले जाते.

५) आकडी हास्य

आकडी हास्य हे हाताच्या साहाय्याने केले जाते. ज्यामध्ये एक बोटाची टाळी, दोन बोटाची टाळी, तीन बोटाची टाळी अशाप्रकारे पाच बोटाची टाळी देत हे हास्य केले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT