Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Navi Mumbai Vashi Local Train News : वाशी रेल्वे स्थानकात लोकल प्रवासादरम्यान २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित असल्याने ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Navi Mumbai Vashi Local TrainSaam Tv
Published On
Summary

लोकल प्रवासादरम्यान हर्ष पटेल याचा हृदयविकाराने मृत्यू

वाशी स्थानकात रुग्णवाहिका चालक अनुपस्थित

‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याचा आरोप

हार्बर रेल्वेवरील सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्न

सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप

विकास मिरगणे, नवी मुंबई

पनवेल–खंडेश्वर दरम्यान धावत्या लोकलमधून एका तरुणीला ढकलून देण्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच,नवी मुंबई वाशी रेल्वे स्थानकात आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सीएसएमटी–पनवेल लोकलमध्ये प्रवासादरम्यान २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पालिका रुग्णालयात मृत्यू . मात्र, रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेलेला असल्याने वेळेवर उपचाररेल्वे प्रसासनाकडून मिळाले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे हार्बर रेल्वे पोलिस व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. तो २ डिसेंबर रोजी दुपारी १.३७ वाजता चेंबूर येथून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढला होता. प्रवासादरम्यान अचानक तो बेशुद्ध पडला. सहप्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर संपर्क साधला. ट्रेन वाशी स्थानकात पोहोचताच जीआरपी कर्मचाऱ्यांनी हर्षला १०८ रुग्णवाहिकेत हलवले. मात्र, त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेलेला असल्याचे समोर आले.

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Leopard : मुंबईच्या वेशीवर बिबट्याची दहशत, बदलापूरच्या रस्त्यांवर दिसला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाहनचालक अनुपस्थित असल्याने हर्षला तातडीने रुग्णालयात नेण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. अखेर रेल्वे प्रवाशी आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी त्याला पोलीस जीपमधून वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. “मृत्यूचे कारण तीव्र हृदयविकाराचा झटका आहे. रुग्णवाहिकेचा चालक २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित होते. कोणताही पर्याय न ठेवता रुग्णवाहिका सोडून जाणे हे निष्काळजीपणाचे आहे,” अशी माहिती वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली. मृत तरुणाला पूर्वीपासून आरोग्यविषयक तक्रारी होत्या, असेही त्यांनी सांगितले.

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

दरम्यान, १८ डिसेंबर रोजी हर्षची बहीण अमिका पटेल हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले. वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हीलचेअर, प्राथमिक उपचार सुविधा तसेच सीपीआर देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचा दावा तिने केला. रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित असल्याने ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळेच भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला. “सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझा भाऊ पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत ट्रेनमध्ये चढताना दिसतो. तो रोजप्रमाणेच प्रवास करत होता,” असे अमिकाने सांगितले. ट्रेन वाशी स्थानकात सुमारे १.५७ वाजता पोहोचली आणि त्याआधीच तो कोसळला असावा, असा तिचा अंदाज आहे. “माहिती मिळताच आम्ही स्थानकात पोहोचलो. मात्र, कोणतीही तातडीची सुविधा नसल्याने नागरिकांच्या मदतीने कपड्याचा वापर करून त्याला सबवेमधून उचलून नेण्यात आले,” असे ती म्हणाली.

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Today Winter Temprature : महाराष्ट्र गारठला! हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या, धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; राज्यात कुठे कसं हवामान?

“स्थानकाबाहेर १०८ रुग्णवाहिका उभी होती, पण चालक नव्हता. सुमारे २.१० वाजता आम्ही भावाला रुग्णवाहिकेत ठेवले आणि चालकाची वाट पाहत राहिलो. ते काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची होती,” असे सांगत अखेर पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरावा लागल्याचेही तिने स्पष्ट केले. अमिकाने असा आरोप केला की, वाशी स्थानकातील अधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थेअभावी अडचणी असल्याचे कबूल केले. “कधी चालक सुट्टीवर जातात, कधी रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी जाते आणि त्याचा कोणताही बॅकअप नसतो,” असा दावा तिने केला.

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल

वाशी जीआरपी चौकीत लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नाही, आणि थेट सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयात जाण्यास सांगितल्याचेही तिने सांगितले. कुटुंबीयांनी डीआरएम कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. पनवेल–खंडेश्वर दरम्यान तरुणीला लोकलमधून ढकलण्याची घटना आणि वाशी स्थानकात वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू, या सलग घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत रेल्वे प्रशासन कितपत सज्ज आहे, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com