Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल

Nandurbar Nagrapanchayat And Nagarparishd Election Result : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुमत मिळवत विजयाचा झेंडा फडकवला आहे. शिवाय भाजपचा पराभव झाला आहे.
Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल
Nandurbar Nagrapanchayat And Nagarparishd Election ResultSaam Tv
Published On
Summary
  • भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तळोद्यात राष्ट्रवादीचा विजय

  • २१ पैकी ११ जागा जिंकत अजित पवार गटाला स्पष्ट बहुमत

  • भाजप केवळ ३ जागांवर, शिंदे गट ७ जागांवर अडकला

  • नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मिळालेला दुसरा मोठा राजकीय धक्का

सागर नाईकवाडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तळोदा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या नाकावर टिचून राष्ट्रवादीने पालिकेवर आपला झेंडा फडकवला असून, थेट मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या उमेदवाराचा येथे दारुण पराभव झाला आहे.

तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधीलच पक्षांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी राष्ट्रवादी अजित पवार गट विश्वास दर्शवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी सातव्या फेरीअखेर 3,428 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल
Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोद्यात जाहीर सभा घेतली होती. भाजपच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभांचा धडाका लावला होता. मात्र, एवढी मोठी रसद असूनही भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी नाकारले आहे..

Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल
Maharashtra Politics : डोंबिवलीत राज ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याने मनसेला केला रामराम

एकूण 21 जागांच्या या रणसंग्रामात राष्ट्रवादीने 11 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फौज असूनही शिवसेना शिंदे गट 7 जागांवर अडकली आणि भाजपची अवस्था तर अत्यंत बिकट झाली असून त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मिळालेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com