घरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर. अनेक पदार्थांची चव चाखायची असेल तर स्वयंपाकघरात जाऊन चमचमीत पदार्थ बनवावे लागतात. या ठिकाणी जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांसोबत आरोग्यही राखले जाते.
परंतु, स्वयंपाकघरात (Kitchen) या ४ गोष्टी सतत वापरत असाल तर आजच फेकून द्या. यामुळे कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारांना (Disease) सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया स्वयंपाकघरातील या वस्तूंबद्दल
1. नॉन स्टिक भांडी
हल्ली प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात नॉन-स्टिक भांडी असतात. या नॉन स्टिक भांड्यांना कोट करण्यासाठी पीएफओए नावाचे रसायन वापरले जाते. अभ्यासातून असे समोर आले आहे की, या पीएफओएच्या कोटिंगमुळे कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो.
2. प्लास्टिकची भांडी आणि बॉटल्स
स्वयंपाकघरात प्लास्टिकची भांडी आणि बाटल्या आपल्याला अधिक पाहायला मिळतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बिस्फेनॉल ए नावाचे रसायन आढळते. ज्याचा वापर प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी केला जातो. या रसायनामुळे हार्मोनल असंतुलन आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची भीती आहे. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
3. अॅल्युमिनियम फॉइल
आपल्या प्रत्येकाच्या घरात रोटी, पराठा, ब्रेड किंवा टिफिनमध्ये कोणतेही खाद्यपदार्थ पॅक करायचे असतील तर अनेकदा अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. यात गरम पदार्थ गुंडाळल्याने कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
4. प्लास्टिक चॉपिंग बोर्ड
किचनमधून केवळ प्लास्टिकच्या बाटल्या नाहीतर चॉपिंग बोर्डही फेकून द्यायला हवे. नियमित चॉपिंग बोर्डवर भाजीपाला कापल्याने प्लास्टिकचे बारीक कण भाजीत मिसळतात. ज्यामुळे पोटाचे विकार होण्याची अधिक शक्यता असते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.