कोमल दामुद्रे
त्वचा तेलकट होणे ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात.
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर सतत मुरुमे आणि ब्लॅकहेड्स देखील येतात.
जर तुमचाही चेहरा सतत तेलकट होत असेल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा
फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
टोमॅटो शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हिरव्या पालेभाज्या, काकाडी, टोमॅटो, संत्री, टरबूज इत्यादी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा
ओमेगा -३ फॅटी अॅसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी सॅल्मन, ट्यूना, फ्लॅक्स सीड्स, अक्रोड आणि चिया सीड्स यांसारखे फॅटी फिशचा आहारात समावेश करा.
झिंक हे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मुरुम आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
शरीरातील झिंकची कमतरता ही भोपळ्याच्या बिया, कडधान्ये, चिकन खाऊन त्वचेचे आरोग्य सुधारु शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.