ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोकांना त्यांच्या घरासोबत आपले बाथरुमही सुंदर ठेवायला आवडते. पाहुणे आल्यावर घरातील बाथरुम चांगले दिसले पाहिजे असे सर्वांना वाटत असते.
आपले बाथरुम आकर्षक दिसावे यासाठी लोक नवीन आरसे, बाथटब आणि सिंक बसवतात. विशेषतः आरसे बाथरुमला पूर्णपणे वेगळा लुक देऊ शकतात.
आजकाल बाजारात बाथरुमसाठी अनेक सुंदर आणि स्टायलिश आरशांच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत. काहींमध्ये तर लाईट्स देखील असतात.
तुम्ही बाथरुममध्ये लाईटवाला मिरर लावू शकता. लाईट वाल्या मिररमध्ये चेहरा एकदम क्लिअर दिसतो.
तुम्ही तुमच्या बाथरुममध्ये ओवल आकाराचे मिरर देखील लावू शकता. तुम्ही मिररच्या बाजूला वूडन किंवा इतर डिझाइन असलेले मिरर निवडू शकता.
जर बाथरुममध्ये पुरेशी जागा असेल, तर तुम्ही लांब फ्रेम निवडू शकता. त्यामुळे एक सुंदर लुक येईल.
जर तुमच्या स्नानगृहाच्या भिंतींवर वॉलपेपर असेल, तर तुम्ही साध्या शैलीचा आरसा लावू शकता. तो आकर्षक दिसेल.
जर तुम्ही मोठे बेसिन बसवले असेल, तर स्नानगृहात मोठा आरसा देखील लावा. आडव्या आरशाऐवजी उभ्या आरशाची निवड करा.
जर तुम्ही बाथरूममध्ये आरशासमोर सेल्फी घेत असाल, तर बॅकलाइटिंग असलेला आरसा घ्या. तो खूप छान दिसेल आणि सेल्फीसाठी एकदम योग्य असेल.