ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाक करताना उडणारे तेल, वाफ आणि मसाल्यांचा थर हळूहळू भिंतीवर साचतो. वेळेवर साफ न केल्यास हे डाग चिकट होतात आणि भिंती काळसर दिसू लागतात.
कोमट पाण्यात थोडा डिशवॉश लिक्विड मिसळा. मऊ कापड किंवा स्पंजने भिंतीवर हलक्या हाताने पुसा. रोजच्या हलक्या डागांसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.
बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा, ५ ते १० मिनिटे ठेवा आणि ओल्या कापडाने पुसा. चिकट तेलकट थर सहज निघतो.
एक कप पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. भिंतीवर स्प्रे करून २ ते ३ मिनिटांनी पुसा. हा उपाय जुने तेलाचे डाग काढण्यासाठी उपयुक्त आहे.
लिंबाचा रस थेट डागांवर लावा किंवा पाण्यात मिसळून वापरा. लिंबातील अॅसिड तेल विरघळवते आणि भिंती स्वच्छ व ताज्या करण्यास मदत करते.
भिंतीवर नवीन तेलाचे डाग असतील तर त्यावर टॅलकम पावडर किंवा कॉर्नफ्लोअर शिंपडा आणि काही वेळाने ते तेल शोषून घेण्यास मदत करतात. नंतर सुक्या कापडाने पुसून घ्या.
सफेद टूथपेस्ट डागांवर लावून घरात असलेल्या जुन्या टूथब्रशने हलके घासा. घासल्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्या. असे केल्यास भिंतीवर बसलेले हट्टी डाग निघण्यास मदत होते.
भिंतीवर जास्त पाणी वापरू घासू नका. जास्त घासल्यास रंग निघू शकतो, त्यामुळे नेहमी पुसण्याकरिता मऊ कापड वापरावा.
स्वयंपाक करताना चिमणी वापरा, गॅसजवळील भिंत आठवड्यातून एकदा तरी पुसा आणि डाग रोखण्यासाठी ऑइल स्प्लॅश गार्ड वापरा,यामुळे भिंती दीर्घकाळ स्वच्छ राहतात.