Sugar Substitutes : साखरेऐवजी करा या ४ पदार्थांचे सेवन, आरोग्य राहिल निरोगी

Alternatives to Sugar: जर तुम्हालाही सतत गोडाचे पदार्थ खाण्यास आवडत असतील आणि तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी असेल तर या पर्यायी पदार्थाचे सेवन करा.
Sugar Substitutes
Sugar SubstitutesSaam tv
Published On

Healthy Alternatives To Sugar To Sweeten Your Dishes :

दररोजच्या जीवनात आपण साखर अधिक प्रमाणात खातो. साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेहासारख्या (Diabetes) गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. रक्तातील साखर वाढली किंवा कमी झाली की, उच्च रक्तदाब साखऱ्या समस्यांना निर्माण होतात.

जर तुम्हालाही सतत गोडाचे पदार्थ खाण्यास आवडत असतील आणि तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी (Care) असेल तर या पर्यायी पदार्थाचे सेवन करा.

1. गूळ

आहारात साखरेऐवजी (Sugar) गुळाचा वापर करा. यामध्ये अनेक अँटिऑक्सि़डेंट असतात. जे तुमच्या आरोग्यासोबतच चवीलाही चांगले लागते. आहारात याचा वापर करुन आरोग्याची काळजी घेऊ शकता.

Sugar Substitutes
Health Disease : स्वयंपाकघरातील या वस्तूमुळे होऊ शकतो कॅन्सरसारखा गंभीर आजार, आजच घराबाहेर फेकून द्या

2. खजूर

साखरेच्या तुलनेत खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे साखरेचे सेवन करुन मिळवू शकत नाही. खजूर अनेक प्रकारे पौष्टिक असतात. यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

3. नारळ

चहा-कॉफीसह अनेक गोष्टींमध्ये साखर अधिक प्रमाणात आढळते. आरोग्याच्या दृष्टीने हा कृत्रिम साखरेचाही पर्याय चांगला आहे. नारळात अनेक पोषक तत्वे असतात. फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ते तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते.

Sugar Substitutes
Dry Skin Remedies : कोरड्या त्वचेमुळे चेहरा खराब दिसतोय? आहारात करा या सूपरफूडचा समावेश

4. मॅपल सरबत

वनस्पतीच्या रसापासून बनवलेली मॅपल शुगरमध्ये कॅल्शियम, मँगनीज, लोह आणि पोटॅशियम देखील समृद्ध आहे. साखरेच्या तुलनेत याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com