Weight Loss Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : जिमचा भरमसाठ खर्च वाचवा आणि घरच्याघरी बारीक व्हा; दररोज करा 'या' सिंपल एक्सरसाइज

Weight Loss Tips at Home : जिम असली तरी तेथे जाण्याचा आणि कसरत करण्याचा सर्वजण कंटाळा करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी जिमशिवाय बारीक कसं व्हायचं याच्या काही सिंपल ट्रिक्स आणल्या आहेत.

Ruchika Jadhav

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीच्या आहारात मोठा बदल झाला आहे. आहारात बदल झाल्याने काही व्यक्तींना वजन वाढण्याच्या देखील समस्या निर्माण होतात. वजन कसं वाढलंय हे पटकन समजत नाही. झटकन वाढलेलं वजन कमी करताना मात्र नाकी नऊ येतात.

वजन वाढल्याने आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. तसेच अनेक व्यक्तींना वजन वाढल्याने लगेचच दम लागतो. त्यासह छान छान सुंदर कपडे आवडले तरी वजन जास्त असल्याने ते घालता येत नाहीत. शिवाय फार कमी वयातच आपण म्हतारे दिसू लागतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बरेच जण जीम लावतात. जिम लावली असली तरी तेथे जाण्याचा आणि कसरत करण्याचा सर्वजण कंटाळा करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी जीम शिवाय बारीक कसं व्हायचं याच्या काही सिंपल ट्रिक्स आणल्या आहेत.

स्पॉट रन

घरबसल्या वजन कमी करायचं असेल तर स्पॉट रनला सुरूवात करा. त्यासाठी तुम्हाला एकाच जागेवर धावावे लागेल. यासाठी घरातील एक कंम्फर्टेबल जागा शोधा. तुम्ही तेथेच १ ते २ मिनिटे धावू शकता. धावल्याने आपल्या शरिरातील बाऱ्याच कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही नवीन नवीन यासाठी सुरूवात केली असेल आणि तुम्हाला दम लागत असेल तर थोड्या थोड्या वेळाचा ब्रेक घेत तुम्ही हा व्यायाम सुरूच ठेवा.

माउंटेन क्लाइंबर

वजन कमी करण्यासाठी माउंटेन क्लाइंबर ही देखील एक सर्वात उपयुक्त आणि रामबाण एक्सरसाइज आहे. हा व्यायाम करत असताना तुम्हाला एका कार्पेटवर पालथं झोपावं लागेल. त्यानंतर दोन हात आणि दोन्ही पायांवर शरीराचा सर्व भाग उचलून घ्या. पुढे आधी उजवा पाय पुढे सरकवत पोटाजवळ घ्या आणि नंतर हा पाय खाली करून दुसरा डावा पाय पोटाजवळ घ्या. ही एक्सरसाइज महिनाभर फॉलो केल्यावर सुद्धा तुम्ही बारीक व्हाल.

बाइसाइकिल क्रंच

बाइसाइकिल क्रंच सुद्धा वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. यामध्ये तुम्हाला आधी जमिनीवर झोपावं लागेल. जमिनीवर झोपून मान आणि पाय वर उचला. जमिनीला मान आणि दोन्ही पाय टेकू देऊ नका. शिवाय दोन्ही हातांनी डोकं पकडा, त्यानंतर उजव्या हाताचा कोपर डाव्या पायाला आणि डाव्या हाताचा कोपर उजव्या पायाला लागेल असं करत राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT