Heart Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Heart Health Tips : मधुमेह आणि बीपीचा त्रास्त आठवडाभरात होईल गायब; आजपासूनच आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

Health Tips : मधुमेह आणि रक्तदाबामूळे त्रस्त आहात? आणि तुमचं वजन पण वाढतयं? मग तुम्ही या पाच गोष्टींचा आहारात करा समावेश

Ruchika Jadhav

मधुमेह, व्यक्तीचे वजन आणि हृदयाचे आरोग्य या तिन्ही गोष्टींचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी संबंध आहे. बऱ्याच संशोधनातून अशी माहिती समजली आहे की, जास्त वजन हे देखील मधुमेह होण्याचे मुख्य कारण असू शकते. लठ्ठपणामुळे व्यक्तीला कोलेस्ट्रॅाल आणि उच्च रक्तदाब या समस्या जाणवतात. शिवाय यामुळे व्यक्तीला हृदयविकाचा धोका असतो. या समस्येतून व्यक्तीला योग्य आहारच वाचवू शकतो. त्यामुळे आज आपण या आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

पालक- व्यक्तीच्या आहारात पालक या भाजीचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे असते. पालकमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि के असते. इतकेच नाही तर यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. पालकच्या भाजीचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

बदाम - बदाम रोज सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय हृदयाचे आरोग्य चांगेल राहण्यासही मदत होते. बदामामध्ये फायबरचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

हिरवे मूग- लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आहारात हिरवे मूग असणे अत्यंत आवश्यक आहे. हिरव्या मूगाच्या सेवनाने कोलेस्ट्रॅाल नियंत्रणात राहण्यास मदत होते शिवाय हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

ओट्स- सकाळी नाश्ताल्या ओटस खाल्ल्याने देखील रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओटसमध्ये फायबर आणि लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहते.

नाचणी- आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी त्यांच्या आहारात नाचणीचा समावेश करावा. नाचणीच्या खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर असतात. नाचणीमधील विविध जीवनसत्वांमुळे वजन कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT