Manasvi Choudhary
वास्तू शास्त्रात, घरातील वस्तू योग्य रित्या कशा ठेवाव्यात याविषयी सांगितले आहे. घरातील ठेवलेल्या वस्तू घरातील वातावरण सकारात्मक ठेवता यासाठी प्रत्येक वस्तू ही योग्य जागी ठेवणे महत्वाचे आहे.
माहितीनुसार, घरामध्ये फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवू नये हे यो वेबस्टोरीतून जाणून घ्या.
महिला घरात फ्रिजवर अनेक वस्तू ठेवतात. सामानाचे डब्बे, उपयोगी वस्तू ठेवतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार, फ्रिजवर काही वस्तू ठेवणे चुकीचे आहे.
गोळ्या- औषधांचा डब्बा वेळीच मिळावा यासाठी महिला फ्रिजवर ठेवतात मात्र असे करू नका यामुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात.
अनेकजण फ्रिजवर चार्जर, दिवे, एक्स्टेंशन कार्ड ठेवतात मात्र फ्रिजवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवल्याने घरातील उर्जेवर परिणाम होतो.
अनेक लोक फ्रिजवर देवांचे फोटो, पूजेच्या वस्तू, धार्मिक पुस्तके ठेवातात मात्र वास्तुशास्त्रानुसार फ्रिजवर या वस्तू ठेवू नका.
सजावटीसाठी फ्रिजवर लहान रोपटे आणि पाण्याचे भांडे ठेवले जाते, मात्र वास्तुशास्त्रानुसार विद्युत उपकरणाच्या वरती पाणी किंवा रोप लावल्याने उर्जेचा समतोल बिघडण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.