High Blood Pressure ला कंट्रोल करायचे आहे? रोज प्या हेल्दी ड्रिंक्स, हृदयाचे आरोग्यही राहिल निरोगी...

High Blood Pressure Control Drink : वातावरणातील बदलामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयावरील कामाचा ताण वाढतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
High Blood Pressure
High Blood PressureSaam Tv
Published On

How To Control High Blood Pressure :

रक्तदाबाच्या समस्येला हल्ली प्रत्येकाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या वयोवृद्धांसोबत लहान मुलांना देखील याचा सामना करावा लागत आहे. रक्तदाब वाढण्याची अनेक कारणे आहेत.

चुकीची जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अधिकचा तणाव यामुळे ही समस्या वाढू लागली आहे. त्यामुळे मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या अदिक वाढतात. वातावरणातील बदलामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयावरील कामाचा ताण (Stress) वाढतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

जर तुमचाही रक्तदाब सतत वाढत असेल तर काही पेय यावर प्रभावी ठरतील. जाणून घेऊया कोणती पेय शरीरासाठी फायदेशीर आहेत.

1. टोमॅटो ज्यूस

टोमॅटोमध्ये लायकोपीन, बीटा-कॅरोटीन , फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमीन सी, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतात. जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच नियमित टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

High Blood Pressure
Hair Loss : सततच्या गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश, केस होतील दाट आणि शायनी

2. ब्लूबेरी रस

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी ब्लूबेरी फायदेशीर ठरते. ब्लूबेरीमध्ये हृदयासाठी आरोग्यदायी गुणधर्म असतात. याशिवाय बीपीही नियंत्रणात राहातो.

3. बीटरुट

बीटरुट हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. याचे नियमित सेवन केल्याने रक्त वाढते. यामध्ये जीवनसत्त्व, खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे बीपी नियंत्रणात राहातो.

High Blood Pressure
Stress Management : परीक्षेचं टेन्शन होईल दूर; तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या टिप्स फॉलो करा

4. डाळिंबाचा रस

डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com