Brain Tumor Early Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Brain tumor symptoms: सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी सांगितली काय आहेत ब्रेन ट्युमरची लक्षणं

Early signs brain tumor: मेंदूतील ट्यूमरची लक्षणं अनेकदा साधी वाटतात पण ती गंभीर असू शकतात. सतत डोकेदुखी, मळमळ, दृष्टीत बदल, फीट्स यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य असून धोका कमी होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

कोणत्याही आजाराचे संकेत शरीर आपल्याला देत असतं. मात्र अनेकदा या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करतो. हेच संकेत अनेकदा मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतात. मेंदूतील ट्यूमर हा दुर्मिळ असला तरी वेळेत त्याचं न झाल्यास तो गंभीर आणि जीवघेणाही ठरू शकतो.

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अभय कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीये. ब्रेन ट्यूमर वेळेत ओळखायचा असेल तर त्याची लक्षणं समजून घेतली पाहिजेत. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

डोकेदुखी आणि मळमळ

मेंदूतील ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा साधी वाटतात. सतत डोकेदुखी होणं हे त्यातील एक प्रमुख लक्षण आहे. जर या वेदना सकाळी उठल्यानंतर किंवा झोपताना जास्त जाणवत असतील तर त्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावं लागणार आहे. सामान्य डोकेदुखीसारखी ही वेदना नसते आणि साध्या औषधांनी ती कमी होत नाही. यासोबतच मळमळणं किंवा उलटी होणं आणि त्यामागे कोणताही पचनाचा त्रास नसणं, हेही गंभीर संकेत ठरू शकतात.

फीट्स येणं

एखाद्या व्यक्तीला पूर्वी कधीही फीट्स आल्या नसतील आणि अचानक ते सुरू झालं तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे मेंदूमधील काही वेगळे बदल झाल्यामुळे होऊ शकतं. याशिवाय, लक्ष कमी लागणं, विसरभोळेपणा वाढणं, गोंधळल्यासारखं वाटणं किंवा स्वभावात बदल होणं अशी लक्षणंही दिसू शकतात. ही लक्षणं हळूहळू वाढत जातात.

दृष्टी, बोलण्यात फरक पडणं

डोळ्यांसमोर धूसर दिसणं, दुहेरी दिसणं किंवा बाजूची दृष्टी कमी होणं हे मेंदूतील विशिष्ट भागांवर दबाव येत असल्याचे संकेत असू शकतात. तसंच अचानक बोलण्यात अडखळणं, शब्द समजण्यात अडचण येणं अशी लक्षणंही दिसून येऊ शकतात. चालताना तोल जाणं, वारंवार पडणं या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये.

अशक्तपणा

शरीराच्या एका बाजूला हळूहळू किंवा अचानक अशक्तपणा येणं किंवा मुंग्या येणं हे मेंदूतील ट्यूमरचं लक्षण असू शकतं. याशिवाय एका कानाने हळूहळू कमी ऐकू येणं किंवा सतत कानात आवाज येणं हे श्रवण नसांजवळील ट्यूमरचे संकेत असू शकतात.

मेंदूतील सर्व ट्यूमर कॅन्सर असतात हा एक मोठा गैरसमज आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन-तृतीयांश ट्यूमर सौम्य असतात. मात्र तेही मेंदूतील महत्त्वाच्या भागांवर दाब आणून गंभीर परिणाम करू शकतात. हा आजार फक्त वयस्कर लोकांनाच होतो हेही चुकीचं आहे. भारतात मुलांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

SCROLL FOR NEXT