Manasvi Choudhary
वजन कमी करण्या दूध-साखरेचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी तुम्ही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी 5 हेल्दी ड्रिंक्स कोणते प्यायचे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
साखरेच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या. ग्रीनटीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील चरबीची पचनक्रिया सुधरवतात.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध मिसळून प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी उकळून किंवा गाळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
बडीशेप रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी गाळून प्यायल्याने शरीराची उष्णता कमी होते, भूक नियंत्रित राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.