Manasvi Choudhary
गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू असते.
लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. अनेकजण गणपती बाप्पासाठी खास पारंपरिक आणि आकर्षक दागिने बनवून घेतात. तुम्हाला देखील लाडक्या गणरायासाठी सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर खालील डिझाईन्स पाहा.
गणरायाच्या मस्तकावर शोभणारा मुकुट तुम्ही सोन्याच्या डिझाईन्समध्ये निवडू शकता. यामध्ये मयूर डिझाईन किंवा कोरीव काम असलेला मुकुट अधिक सुंदर दिसतो.
लाडक्या गणरायासाठी तुम्ही हार बनवू शकता. सोन्याचा हार राजेशाही लुक देतो.
गणरायासाठी तुम्ही खास सोन्याच्या मण्यांची लांब मोहनमाळ बनवून घ्या. यामध्ये गणरायाचे रूप अधिकच खुलून दिसते.
गणरायासाठी हाताच्या दंडावर शोभणारे सोन्याचे बाजूबंद तुम्ही बनवून घेऊ शकता.
गणरायासाठी कानांवर साजेसे लहान व आकर्षक सोन्याचे कुंडल किंवा कर्णफूल निवडू शकता.