Manasvi Choudhary
गणेशोत्सवात पारंपरिक आणि स्टायलिश लूक करण्यासाठी नऊवारी साडी तुम्ही नेसू शकता. नऊवारीच्या विविध रंग, काठ आणि डिझाईन्स पॅटर्न्स आहेत.
गणेशोत्सवाच्या तुमचे सौंदर्य आणखी खुलवून येण्यासाठी नऊवारी साडीच्या 5 सुंदर आणि ट्रेंडी डिझाईन्स पाहूया.
पैठणी साडी प्रत्येक महिलेची पंसती आहे. नक्षीकाम आणि काठाच्या डिझाईन्समुळे या साड्या ट्रेडमध्ये असतात. हिरवा, लाल, पिवळा किंवा जांभळा रंगांच्या पैठणी तुम्ही निवडू शकता.
जर तुम्हाला थोडा हेवी, रिच लूक हवा असेल, तर पेशवाई कांजीवरम नऊवारी साडी तुम्ही निवडू शकता.
तुम्हाला हलकी आणि कम्फर्टेबल नऊवारी हवी असेल, तर अस्सल सुती कोल्हापुरी नऊवारी साडी नेसू शकता. ही दिसायला अतिशय देखणी आणि नेसायला सोपी असते.
तुम्हाला जर नऊवारी साडी नेसता येत नसेल तर तुम्ही रेडीमेड साडी निवडा. रेडीमेड किंवा स्टिच केलेली 'रेडी टू वेअर नऊवारी' तुम्ही निवडू शकता.
नऊवारी साडीच्या डिझाईनसोबतच नऊवारीचा खरा बाज हा नेसण्याच्या स्टाईलवर असतो. डिझायनर चंदेरी किंवा मटका सिल्क कापड तुम्ही निवडू शकता.