Manasvi Choudhary
फुलांच्या डिझाईनचे मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही देखील सणासुदीसाठी हे मंगळसूत्र शोधत असाल तर खालील डिझाईन्स नक्की पाहून घ्या.
फुलांच्या मंगळसूत्राचे 5 डिझाईन्स कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डबल साईड फ्लोरल मंगळसूत्रामध्ये दोन्ही बाजूंना फुलांचे पेंडंट किंवा डिझाईन असते. पारंपारिक मराठमोळ्या पैठणी किंवा सिल्क साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसते.
तुम्हाला फुलांच्या मंगळसूत्रामध्ये काहीतरी हटके आणि वेगळा पॅटर्न हवा असेल, तर तुम्ही छोट्या-छोट्या फुलांच्या डिझाईन्सचे लटकन असलेले मंगळसूत्र बनवून घेऊ शकता. हे डेलीवेअरसाठी खूपच क्युट दिसते.
ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी अत्यंत सिम्पल, सोबर आणि लाईटवेट मंगळसूत्र हवे असल्यास सिंगल फ्लॉवर पेंडंट बेस्ट आहे. यामध्ये साध्या सोन्याच्या चेनसोबत एक सुंदर फूल उठून दिसते.
साडी असो किंवा मॉडर्न ड्रेस, सर्व प्रकारच्या कपड्यांवर साजेसे वाटेल असे युनिक फ्लोरल पॅटर्न तुम्ही निवडू शकता. यामध्ये पारंपारिक काळ्या मोत्यांसोबत आधुनिक फुलांच्या डिझाईन्सचे अनेक प्रकार उपलब्ध असतात.
ज्या महिलांना खूप जास्त डिझाईन्स नको असतात, त्यांच्यासाठी अगदी बारीक चेनमध्ये एक छोटेखानी फुलांचे डिझाइन असलेले मिनिमल मंगळसूत्र अतिशय एलिगंट लुक देते.