Manasvi Choudhary
किचनमधील छोट्या छोट्या गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या नादात आपण अशा काही गोष्टी वापरतो, ज्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
किचनमध्ये अजिबात वापरू नयेत किंवा तातडीने बदलल्या पाहिजेत असे घातक 3 पदार्थ कोणते? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
घरांमध्ये भांडी घासण्यासाठी स्पंजचा वापर केला जातो. पण स्पंजमध्ये ओलावा साचून राहिल्यामुळे त्यात अन्नाचे सूक्ष्म कण अडकून पडतात आणि जिवाणू व बुरशीची वाढ होते.
स्पंजऐवजी नारळाच्या काथ्यापासून बनवलेले नॅचरल स्क्रबर किंवा लाकडाच्या फायबरचे ब्रशेस तुम्ही वापरा, जे लवकर सुकतात.
बाजारात मिळणाऱ्या अनेक रंगीत आणि सुगंधित डिशवॉशिंग जेल्समध्ये 'आयसोथियाझोलिनोन' आणि कृत्रिम केमिकल्स असतात. ही केमिकल्स भांड्यांवर राहिल्यास अन्नावाटे पोटात जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचाविकार आणि पोटाचे आजार होऊ शकतात.
अनेकदा गरम पोळ्या किंवा खाण्याचे पदार्थ पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइल वापर केला जातो. पण गरम अन्न पदार्थांत ॲल्युमिनियमचे अंश विरघळतात, ज्यामुळे किडनी, मज्जासंस्था आणि आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
अन्न पॅक करण्यासाठी फॉइलऐवजी स्वच्छ सुती कपडा किंवा कागदी बटर पेपरचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.