Nose Bleeding: उन्हाळा सुरू होताच नाकातून रक्त येतंय का? हे संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा

Nosebleeds in Summer: उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं? जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर त्यावर काय उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.
Nose Bleeding
Nose Bleedingsaam tv
Published On

उन्हाळ्याची चाहूल लागली की बऱ्याच आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. यामध्येच एक समस्या म्हणजे नाकातून रक्त येण्याची समस्या. तापमान वाढत असताना अनेकांना हा त्रास जाणवू लागतो. मात्र हा केवळ उष्णतेचा परिणाम नसून कधी-कधी गंभीर आजाराचा इशाराही असू शकतो.

नाकातून रक्त येण्यामागे काय असतं कारण?

नाकातून रक्त येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नाकाच्या आतली अतिशय नाजूक आणि संवेदनशील त्वचा. या भागात अतिशय बारीक रक्तवाहिन्या असतात. उन्हाळ्यात गरम वारे आणि हवेत कमी झालेली आर्द्रता यामुळे ही त्वचा खूप कोरडी पडते. त्यामुळे या रक्तवाहिन्या सहज फुटू शकतात आणि नाकातून रक्त येऊ लागते.

Nose Bleeding
Cholesterol signs on face: तुमच्या त्वचेमध्ये हे बदल दिसले तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलंय; 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

याशिवाय जोरात खोकला येणं किंवा सतत शिंका येणं यामुळेही या नसा ताणल्या जाऊन फुटू शकतात. काही लोकांमध्ये अॅलर्जी, सायनस किंवा नाकाच्या आत झालेली किरकोळ दुखापत हीदेखील कारणीभूत ठरते. तसंच काही वेळा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतलेल्या औषधांमुळेही नाकातून रक्त येण्याची समस्या वाढू शकते.

काय उपाय केले पाहिजेत?

नाकातून रक्त येत असेल, तर घाबरून न जाता काही सोप्या उपायांनी परिस्थिती नियंत्रणात आणता येते. डोकं थोडं वर ठेवावं, जेणेकरून रक्त घशात जाणार नाही. नाक हलक्या हाताने दाबून धरल्यास रक्त थांबण्यास मदत होते. याशिवाय नाकावर किंवा मानेवर थंड पाण्याचा कपडा ठेवल्यासही आराम मिळतो. घरातील हवेत ओलावा टिकवून ठेवणंही महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे नाक कोरडं पडत नाही.

Nose Bleeding
Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

डॉक्टरांची भेट कधी घ्यावी?

मात्र ही समस्या वारंवार होत असेल किंवा रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः जर नाकातून येणारं रक्त ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नसेल, किंवा ते गळ्यापर्यंत जात असल्याची जाणीव होत असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Nose Bleeding
Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

नाक किंवा डोक्याला इजा झाल्यानंतर रक्त येत असेल आणि आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा हा त्रास होत असेल, किंवा आधीपासून काही औषधं सुरू असतील किंवा कुटुंबात असा इतिहास असेल, तरीही डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात अशा छोट्या वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com